का बरं रोहित शर्माने मागितली असेल ऋषभ पंतची माफी?


गयाना – वेस्ट इंडिजविरुध्दची टी-२० मालिका टीम इंडियाने ३-० अशी एकतर्फी जिंकली. यष्टीरक्षक ऋषभ पंत याने तिसरी आणि अंतिम टी-२० सामन्यात दमदार कामगिरी केली. या सामन्यात त्याने स्फोटक खेळी करत अर्धशतक झळकावले. तेव्हा भारताचा सलामीवीर रोहित शर्माने या सामन्यानंतर पंत विषयी बोलताना चूक केली. यावर रोहित शर्माने तात्काळ पंतची माफी देखील मागितली.


रोहितने पंत याची अंतिम सामन्यानंतर मुलाखत घेतली. तो या मुलाखतीदरम्यान, पंतला संत म्हणाला. त्याची चूक त्याला लक्षात येताच पुन्हा त्याने पंत असा उल्लेख करत माफी मागितली. बीसीसीआयने या दोघांचा हा व्हिडिओ ट्विट केला आहे. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

Leave a Comment