वाढत्या उष्णतेमुळे वेगाने वितळतोय ग्रीनलँडमधील बर्फ   


युरोपमधील उष्णतेचा परिणाम ग्रीनलँडवर होताना दिसून येत आहे. या उष्णतेच्या लाटेमुळे ग्रीनलँडमधील बर्फे तेजीने वितळत आहे.  हवामान तज्ञ रूत मोटरम म्हणाले की, बर्फाचा थर वितळल्यामुळे जुलै महिन्यात तब्बल 197 बिलियन टन पाणी अटलांटिक महासागरात जमा झाले आहे. सेटेलाईटद्वारे घेण्यात आलेल्या फोटोने सर्व चित्र स्पष्ट झाले आहे.

फोटोमध्ये दिसून येते की 2018-19 मध्ये बर्फाच्या थरामध्ये वाढ झाली होती. तसेच सुर्याची प्रकाशामुळे तेथील बर्फ मोठ्या प्रमाणात वितळताना दिसत आहे.

यंदाच्या वर्षी काढलेल्या फोटोमध्ये दिसून येत आहे की, पश्चिमी ग्रीनलँडमध्ये मोठ्या प्रमाणावर बर्फ वितळला आहे. 2012 प्रमाणेच यंदा देखील उष्णतेमुळे बर्फ मोठ्या प्रमाणात वितळल्याचे दिसून येत आहे.

ग्रीनलँडमधील बर्फ हा सामान्यता उन्हाळ्यात वितळत असतो. मात्र यंदा मेच्या पहिल्या आठवड्यापासूनच बर्फ वितळण्यास सुरूवात झाली असून, गेली चार वर्षांपासून सतत बर्फ वितळ आहेत.

फक्त जुलै महिन्यातच 19 हजार 700 करोड टन बर्फाची चादर विरघळली आहे. हे पाणी 8 करोड ऑल्मिपक स्विमिंग पुलच्या एवढं आहे. वैज्ञानिकांनी सांगितले की, 1950 नंतर पहिल्यांदाच ग्रीनलँडमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात बर्फ वितळला आहे.

Leave a Comment