खासदार नुसरत जहांचा ‘दगाबाज’ टीक-टॉक व्हिडीओ व्हायरल


तृणमूल काँग्रेसच्या खासदार आणि बंगाली अभिनेत्री नुसरत जहां सोशल मीडियावर सक्रिय आहे. फेसबूक, ट्विटर, इंस्टाग्राम आणि टिकटॉक सारख्या सोशल मीडियावरून लोकांशी सतत जोडलेली असते. अभिनेत्रीनंतर निवडणूक लढवत ती खासदार झाली. त्यानंतर बंगालमधील उद्योगपती निखिल जैनबरोबर लग्न केल्यानंतर देखील ती चर्चेत आली होती. काही दिवसांपुर्वी तिने शेअर केलेले हनीमूनचे फोटो देखील लोकांना विशेष आवडले होते. आता तिचा एक नवीन व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ती सलमान खानचे गाणे दगाबाजवर परफॉर्म करताना दिसत आहे.

व्हिडीओमध्ये दिसून येते की, नुसरत जहां मेकअप रूममध्ये बसली असून, मेकअप आर्टिस्ट तिचा मेकअप करत आहे. तर नुसरत जहा मोबाईलवर टिकटॉक व्हिडीओ बनवत आहे. या व्हिडीओमध्ये तिने साडी घातली असून, त्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.

नुसरत जहांने यावर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवली होती. बशीरहाट मतदार संघातून ती तब्बल 3.5 लाख मतांनी विजय झाली होती.

बंगाली अभिनेत्री असलेल्या नुसरतने आपल्या करिअरची सुरूवात ‘शोत्रू’ चित्रपटापासून केली होती. त्यानंतर ती ‘खोका 420’ आणि ‘लव एक्सप्रेस’ सारख्या चित्रपटांमध्ये देखील दिसली होती. नुसरत जहांने ‘फेअरवन मिस कोलकाता’ हा किताब देखील आपल्या नावावर केला आहे.

Leave a Comment