सर्वाधिक कमाई करणाऱ्या महिला खेळाडूंच्या यादीत पी. व्ही. सिंधू एकमेव भारतीय


नवी दिल्ली – भारतीय बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू ही फोर्ब्सच्या यादीमध्ये सर्वाधिक कमाई करणारी एकमेव भारतीय खेळाडू ठरली आहे. मंगळवारी फोर्ब्सने जाहीर केलेल्या यादीनुसार, ३९ कोटी एवढी सिंधूची वार्षिक कमाई असून या यादीत ती १३ व्या स्थानावर आहे.

अमेरिकेची टेनिसपटू सेरेना विल्यिम्स ही फोर्ब्सच्या या यादीत प्रथम क्रमांकावर आहे. तिची वार्षिक कमाई २०० कोटीहून अधिक आहे. त्यानंतर जपानची टेनिस खेळाडू नाओमी ओसाका हिचा नंबर लागतो. २०० कोटींच्या जवळपास तिची वार्षिक कमाई आहे.

फोर्ब्सच्या २०१९ च्या यादीनुसार, पी. व्ही. सिंधू भारताची एकमेव खेळाडू आहे. सिंधूने नुकत्याच पार पडलेल्या इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत अंतिम फेरी गाठली होती. पण अंजिक्यपदावर तिला आपली मोहोर उठवता आली नाही. अंतिम सामन्यात जपानच्या अकाने यामागुची हिने तिचा पराभव केला.

Leave a Comment