देसी गर्ल शोधत आहे 140 कोटींचा नवीन आशियाना


बॉलीवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा आणि तिचा पती निक जोनस हे दोघेही प्रसिध्द कपल्स आहेत. दोघांचेही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात. कधी दोघे डान्स करतात तर कधी रोमँन्टिक मूडमध्ये दिसून येतात. सध्या प्रियंका आणि निक दोघेही लॉस एंजिलेसमध्ये नवीन घराचा शोध घेत आहेत. या घरासाठी दोघांचे बजेट दोन करोड डॉलर म्हणजेच 140 करोड रूपये आहे.

प्रियंका आणि निक दोघे लॉस एंजिलेसच्या बेवर्ली हिल्स जवळ घर शोधत आहेत. आपल्या नवीन घरासाठी दोघांनी 140 करोड रूपयांचे बजेट ठरवले आहे. 2 करोड डॉलरमधील 65 लाख डॉलर त्यांनी बेवर्ली हिल्सजवळी जुने घर विकून जमवले आहेत.

निक आणि प्रियंकाचे आधीचे घर हे 4,129 स्केअर फुट एवढे होते.  मात्र आता ते लॉस एंजिलेसच्या बेल एरिया किंवा बेवर्ली हिल्स भागात घर शोधत आहेत.

प्रियंकाचा पुढील चित्रपट ‘द स्काय इज पिंक’ 11 ऑक्टोंबरला रिलीज होणार आहे. खास गोष्ट म्हणजे तिच्या या चित्रपटाचा टोरंटो इंटरनँशनल फिल्म फेस्टिवलमध्ये वर्ल्ड प्रिमिअर होणार आहे. या चित्रपटात तिच्याबरोबर फरहान अख्तर आणि जायरा वसीम देखील दिसणार आहेत.

Leave a Comment