जर महाकाय ‘अपोफिस’ पृथ्वीला धडकला तर !


काही दिवसांपूर्वी अमेरिकन स्पेस एजन्सी नासाने, अमेरिकेतील एम्पायर स्टेट बिल्डींग पेक्षाही आकाराने मोठा असलेला एका लघुग्रह, म्हणजेच अॅस्टेरॉईड, दहा ऑगस्टच्या दरम्यान पृथ्वीच्या अतिशय जवळून जाणार असल्याचे म्हटले आहे. या अॅस्टेरॉईडचे नामकरण 2006 QQ२३ असे करण्यात आले आहे. मागील आठवड्यात आणखी एक अॅस्टेरॉईड पृथ्वीच्या अतिशय जवळून गेला असला, तरी याच्यापासून पृथ्वीला विशेष धोका नसल्याने याच्याविषयी जास्त चर्चा झालेली पहावयास मिळाली नाही. अलीकडच्या काळामध्ये नील डीग्रासी टायसन नामक वैज्ञानिकाने ‘अपोफिस ९९९४२’ हा लघुग्रह पृथ्वीच्या अतिशय जवळ आला असून, तो जर पृथ्वीला धडकला तर पृथ्वीवर ‘अॅस्टेरॉईड सुनामी’ येऊन उत्तर अमेरिकेचा संपूर्ण पश्चिमी तट नष्ट होण्याचा धोका असल्याचे म्हटले आहे. हा लघुग्रह पृथ्वीला धडकण्याची शक्यता अवघी तीन टक्के असली, तरी ही शक्यता प्रत्यक्षात आली, तर त्याचे दुष्परिणाम दुर्लक्षिता नक्कीच येणार नाहीत.

सुरुवातीला वैज्ञानिकांनी वर्तविलेल्या अंदाजाच्या अनुसार हा लघुग्रह पृथ्वीला धडकणार असल्यास १३ एप्रिल २०२९ रोजी धडकणार असल्याचे म्हटले जात होते. पण त्यानंतर २००६ साली वैज्ञानिकांनी नव्याने मांडलेल्या अंदाजाच्या अनुसार हा लघुग्रह २०३६ साली पृथ्वीपासून सहाशे मैलांवरून जाईल असे म्हटले गेले. अंदाज जर प्रत्यक्षात आला, तर मात्र हा लघुग्रह ‘ग्रॅव्हिटेशनल कीहोल’द्वारे जाणार असून, त्यायोगे महासागरांमध्ये मोठ्या सुनामी येण्याची शक्यता वैज्ञानिकांनी वर्तविली आहे. या सुनामी आल्यांनतर समुद्रांतून पन्नास फुटांच्या पेक्षा अधिक उंच लाटा उसळणार असून, यांच्यायोगे संपूर्ण उत्तरी अमेरिकेच्या सागर किनाऱ्या नजीकची शहरे उध्वस्त होणार असल्याचा अंदाजही वैज्ञानिकांनी वर्तविला आहे. मात्र हे केवळ एक शक्यता असून, ही शक्यता प्रत्यक्षात उतरण्याची संभावना केवळ तीन टक्के इतकीच असल्याचेही डॉक्टर टायसन यांनी ‘डेली एक्स्प्रेस’शी बोलताना म्हटले आहे.

Leave a Comment