या 330 फुट उंच धबधब्यावर सहज चढतात लोक


जर तुम्ही थायलंडला जाण्याचा विचार करत असाल, तर थायलंडमधील हे एक ठिकाण तुमच्या यादीत नक्कीच असायला हवे. द बुवा टाँग वॉटरफॉल किंवा नाम्फू चेट सी हा धबधबा स्टिकी वॉटरफॉल अर्थात चिकट वॉटरफॉल म्हणून ओळखला जातो. हा धबधबा श्रीलंका नॅशनल फॉरेस्टच्या भागात आहे. या धबधब्यावर तुम्ही सहज चढू शकता. एडव्हेंचर किंवा थ्रिल अनुभव घेणाऱ्यांनी या ठिकाणी नक्कीच भेट द्यायला हवी.

धबधबा स्टिकी अर्थात चिकट असण्याचे कारण, याच्या पाण्यामध्ये कॅल्शियमची मात्रा जास्त असून, त्यामुळे खडकांवर चुनीखडी तयार होत आहे. त्यामुळे या धबधब्यावरून चढणारा व्यक्ती घसरत नाही.

थायलंडला येणाऱ्या पर्यटकांचे हे एक आकर्षक ठिकाण आहे. अनेक लोक एडव्हेंचर करण्यासाठी या धबधब्यावर चढतात. तुम्ही देखील थायलंडला जाण्याचा विचार करत असाल, तर या ठिकाणाला नक्की भेट द्या.

Leave a Comment