व्हिडीओ : चक्क चिंपाझी घालत आहे कुत्र्याला आंघोळ


सोशल मीडियावर दररोज असे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात, जे बघून लोक हैराण होऊन जातात. एक असाच आश्चर्यचकित करणारा चिंपाझी आणि कुत्र्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दोन चिंपाझी कुत्र्याला आंघोळ घालत आहेत. केएफसी रेडिओने आपल्या ट्विटरवरून हा व्हिडीओ शेअर करत लिहिले की, अशी अप्रतिम नोकरी कुठेच उपलब्ध नसेल.


व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, आधी चिंपाझीला शेम्पू लावतात व नंतर त्याला घासून घासून आंघोळ घालत आहेत. त्यानंतर ते स्वतः देखील टबमध्ये उतरतात आणि आंघोळ करू लागतात.  या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती देखील दिसत असून, तो कुत्र्याला शेम्पू लावण्यासाठी चिंपाझींची मदत करत आहे.


हा व्हिडीओ बघितल्यानंतर ट्विटरवर लोक अनेक कमेंट्स करत आहेत. एका युजरने लिहिले की, हा या वर्षीचा सर्वोत्तम व्हिडीओ आहे. हा व्हिडीओ दोन ऑगस्टला शेअर करण्यात आला असून, आतापर्यंत या व्हिडीओ 70 लाखांपेक्षा अधिक वेळा बघण्यात आले आहे.

Leave a Comment