डेबिट-क्रेडिट कार्ड न वापरता करता येणार व्यवहार, जाणून घ्या आरबीआयचा नियम


आता तुम्हाला पैसे देण्यासाठी तुमचा कार्ड नंबर सांगावा लागणार नाही. आता बँक प्रत्येकवेळेस तुम्हाला एक नवीन नंबर पाठवणार आहे. या प्रक्रियेसाठी आरबीआयने नवीन नियमावली जाहीर केली आहे.

क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड वापरताना अनेक धोके निर्माण होत असतात. याच कारणामुळे अनेक लोक कोणत्याही डिवाईस अथवा ई-कॉमर्स वेबसाईटवर आपला कार्ड डाटा स्टोर करत नाहीत. आता कार्डांद्वारे होणारे व्यवहार अधिक सुरक्षित होणार असून, आता तुम्हाला कोणताही व्यवहार करताना, तुमचा कार्ड नंबर सांगावा लागणार नाही.

नवीन नियमांनुसार, कोणत्याही व्यवहारासाठी बँक तुम्हाला एक टोकन नंबर देईल आणि त्याच टोकन नंबरद्वारे व्यवहार केले जातील. या नवीन प्रक्रियेत कार्डच्या माहितीला या टोकन नंबरद्वारे बदलले जाणार आहे. कोणत्याही थर्ड पार्टी अथवा वेबसाईटला केवळ हा टोकन नंबर द्यावा  लागणार आहे.

टोकन नंबर आल्याने कोणत्याही वेबसाईटवर कार्ड डिटेल सेव्ह असण्याचा धोका देखील टळणार आहे. त्याचबरोबर पीओएस आणि क्यूआर कोडचा वापर करून व्यवहार करताना देखील टोकनचा वापर होईल. प्रत्येक व्यवहारासाठी वेगवेगळे टोकन असेल व यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

या प्रक्रियेची सुरूवात झाल्यावर तुमचा कार्ड नंबर कोणालाच माहिती पडणार नाही. बँकेच्या कर्मचाऱ्यांना देखील याची माहिती नसेल. कोणत्याही घोटाळ्याच्या व्यवहाराला कार्ड कंपन्याच जबाबदार असतील.

सध्या टोकन नंबरची सुविधा ही केवळ मोबाईल फोन आणि टँबलेटसाठी असेल. हळहळू दुसऱ्या डिवाईससाठी हे प्रक्रिया लागू करण्यात येईल. टोकन नंबरबरोबर पिन नंबरची प्रक्रिया देखील सुरू राहणार आहे.

Leave a Comment