अवघ्या 7 दिवसात तयार झाला जगातील सर्वात छोटा लॅपटॉप


तुम्ही जगातील सर्वात छोटा लॅपटॉप बघितला आहे का ? नाही ना. जगातील सर्वात छोटा लॅपटॉप बनवण्यासाठी केवळ सात दिवसे लागले असून, यासाठी 85 डॉलर म्हणजेच सहा हजार रूपये खर्च आला आहे.

पॉप क्लिंगर नावाच्या अमेरिकन इंजिनिअरने हा लॅपटॉप बनवला आहे. हा जगातील सर्वात लहान लॅपटॉप असल्याचे सांगितले जात आहे.

या अनोख्या लॅपटॉपची स्क्रीन केवळ एक इंच असून, याचा डिस्प्ले 0.96 सेंटीमीटर आहे. याला बनवणाऱ्यांने लेनोवोच्या थिंकपँड नावावरून याचे नाव थिंक टिनी ठेवले आहे.

या छोट्याशा लॅपटॉपमध्ये कोणत्याही मोठ्या लॅपटॉपमध्ये असलेले सर्व महत्त्वाची बटने आहेत. यामध्ये 300 एमएएचची बॅटरी असून, तिला चार्ज देखील केले जाऊ शकते.

या छोट्या लॅपटॉपचे वैशिष्ट म्हणजे यात गेम देखील खेळता येते. यासाठी किपॅडच्या मध्यभागी लाल रंगाचे ट्रँक पॉईंट स्टाइल कर्सर कंट्रोलर देण्यात आले आहे.

Leave a Comment