पायलटने भर रस्त्यात विमान उतरवल्याने घाबरून पळाली लोक


अमेरिकेची राजधाना वॉशिंग्टनमध्ये असे काही घडले की, त्याने सर्वच जण आश्चर्यचकित झाले आहेत. एका पायलटने आपल्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग थेट हायवेवरच केली. एअरक्राफ्टला हायवेवर उतरताना बघून लोक देखील आश्चर्यचकित झाली आणि रोडवरून पळून गेली. सोशल मीडियावर या घटनेचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. गुरूवारी सकाळी 8 वाजून 15 मिनिटांनी एक छोटेसे विमान रस्त्यावर उतरले. अधिकाऱ्यांनी सांगितले की, केआर2 एअरक्राफ्टची इंधर प्रणाली खराब झाल्याने हायववेर इमर्जन्सी लँडिंग करावी लागली.

तसेच, या घटनेमध्ये कोणालाही दुखापत झालेली नाही. व्हिडीओमध्ये दिसते की, विमान हायवेवर उतरत आहे. उतरल्यावर विमान सिग्नलला उभे राहते आणि त्यानंतर पायलट हाताने ओढत त्याला बाजूला घेतो.

https://twitter.com/RaBenson10/status/1157040042050609152

व्हिडीओला अनेक लोक कमेंट करत असून, पायलटचे देखील कौतूक करत आहेत.

जॉन बतिस्ते यांनी सांगितले की, त्याला माहित होते की, इमरजेन्सी लँडिंग करावे लागेल आणि तो ह करण्यास सक्षम होता. ट्रॅफिक थांबवण्यात आले होते त्यामुळे कोणत्याही गाडीला अथवा चालकाशी त्याचा संपर्क झाला नाही.

Leave a Comment