…आणि मुरली विजय मैदानातच नाचू लागला


भारतीय क्रिकेटपटू मुरली विजय सध्या टी-20 प्रकारात चांगल्याच फॉर्ममध्ये आहे. सध्या तो तामिळनाडू प्रिमिअर लीगमध्ये रूबी ट्रिकी वॉरियर्सकडून खेळत आहे. या स्पर्धेत मुरली विजयचा संघ अंकतालिकेत सर्वात शेवटच्या क्रमांकावर आहे; पण असे असले तरी देखील विजय या स्पर्धेत सातत्याने धावा करत असल्याने त्याचा आत्मविश्वास चांगलाच वाढलेला दिसून येत आहे.

या स्पर्धेत खेळताना विजय काहीतरी नवीन करण्याचा देखील प्रयत्न करत आहे. अंकतालिकेत वरच्या स्थानावर असलेल्या डिंडिगुल ड्रेगंस यांच्याबरोबर झालेल्या सामन्यात विजय चक्क डाव्या हाताने फलंदाजी करताना दिसला. भारतीय स्पिनर्स रविचंद्रन आश्विनच्या गोलंदाजीवर विजयला डाव्याहाताने फलंदाजी करताना बघून सर्वचजण आश्चर्यचकित झाले.

विजय केवळ डाव्या हाताने फलंदाजी करताना थांबला नाही. सामन्याच्या 16 व्या ओव्हरला अश्विन गोलंदाजी करत असताना विजय मैदानावरच आपल्या हटके स्टाईलमध्ये डान्स करताना दिसून आला. यावेळी तो 73 धावांवर खेळत होता. विजयचा हा हटके डान्सबघून प्रेक्षकांना देखील नक्कीच हसायला आले असेल.

Leave a Comment