‘कॉल ड्रॉप’च्या समस्येची ‘या’ पद्धतीने करा तक्रार


आपण सध्या डिजीटल युगात वावरत असल्यामुळे आपल्यापैकी प्रत्येकालाच स्मार्ट रहाण्याची सवय झाली आहे. त्यामुळेच आपल्या हातात सध्याच्या घडीला घड्याळ कमी आणि स्मार्टफोन जास्त दिसतो. स्मार्टफोनवरील एका अॅपमुळे तसेच काही महत्वाची कामे पूर्ण होतात. पण तुम्हाला जर कॉल ड्रॉपची समस्या वारंवार येत असल्यास काही सुचत नाही. कॉल ड्रॉपची समस्या दिवसातून दोन तीन वेळेस उद्भवतेच. त्यात देशात नेटवर्कच्या समस्येची अधिक भर पडत आहे. पण तुम्हाला होणाऱ्या या कॉल ड्रॉपच्या त्रासापासून दूर रहायचे असल्यास ट्रायकडे यासंबंधित अनेक अॅप आहेत. तुम्हाला जाणवणाऱ्या समस्येचे निवारण तेथे करु शकता. स्मार्टफोन, टीव्ही किंवा केबलसंबंधित ही समस्या असू शकते. ट्रायने यासाठी तुम्हाला TRAI MyCall नावाचे अॅप उपलब्ध करुन दिले आहे.

क्राउड-सोर्स कॉल क्वालिटी मॉनिटरिंग TRAI MyCall हे अॅप आहे. ग्राहक याच्या सहाय्याने थेट ट्रायला व्हॉइस कॉल क्वॉलिटीसाठी तक्रार करु शकता. आयफोन आणि अँन्ड्रॉइ़ड स्मार्टफोनमधून हे अॅप डाऊनलोड करु शकता. त्याचसोबत या अॅपमध्ये पारदर्शक TPS डेटा पॉलिसी देण्यात येते. या ट्राय मायकॉल अॅपच्या माध्यमातून ग्राहक तक्रार नोंदवू शकतात.

ट्राय मायकॉल अॅपच्या माध्यमातून या पद्धतीने तक्रार करण्यासाठी My Call App चे नवीन व्हर्जन प्रथम डाऊनलोड करा. गुगल प्ले स्टोअरमध्ये जाऊन अॅन्ड्रॉइ़ड युजर्स TRAI MyCall अॅप डाऊनलोड करु शकतात. अॅप डाऊनलोड झाल्यानंतर Accpet ऑप्शन येतील त्यावर क्लिक करावे. यामध्ये मोबाईल क्रमांक, कॉल, हिस्ट्री, मेसेज आणि लोकेशन दिसणार आहे. त्यानंतर एखाद्या व्यक्तीला फोन करा किंवा तुम्हाला समोरुन फोन येण्याची वाट पहा. फोन आल्यास तो लगेच कट झाल्यास एक पॉप-अप विंडो तुम्हाला मोबाईलच्या स्क्रिनवर दाखवण्यात येईल. त्यामध्ये कॉलसाठी रेटिंग किती द्यायची हे दाखवले जाईल. तसेच जर तुम्हाला कॉल ड्रॉपची समस्या जाणवल्यास तेथे कॉल ड्रॉप ऑप्शनवर क्लिक करावे. तुम्हाला वरील सोप्या पद्धतीने जाणवत असलेल्या कॉल ड्रॉपच्या समस्येची तक्रार ट्रायकडे करु शकता. तसेच ट्रायचे अॅप किंवा ऑनलाईन पद्धतीने सुद्धा तुमची तक्रार ट्रायकडे तुम्हाला करता येणार आहे.

Leave a Comment