नासाने शोधलेल्या या नवीन ग्रहावर मानवी जीवन शक्य


वैज्ञानिकांनी अशा ग्रहाचा शोध लावला आहे, ज्यावर मानवी जीवन शक्य आहे.  हा ग्रह सौर मंडळाच्या बाहेर सापडला आहे. पृथ्वीपासून हा ग्रह तब्बल 31 प्रकाश वर्ष लांब आहे. या सुपर अर्थ ग्रहाला जीजे 357-डी (GJ 357d) असे नाव देण्यात आले आहे. या ग्रहाचा शोध नासाच्या सेटेलाईटद्वारे लावण्यात आला असून, नासाच्या ट्रांजिटिंग एक्सोप्लेनेट सर्वे सेटेलाईटद्वारे यावर्षीच्या सुरूवातीला या ग्रहाचा शोध लावण्यात आला होता.

अमेरिकेच्या कॉर्नेल युनिवर्सिटीतील असिस्टेंट प्रोफेसर आणि टीईएसएस विज्ञान टीमची सदस्य लिजा कलटेनेगर म्हणाली की, ‘सुपर अर्थ’चा शोध लागणे ही उत्साहजनक गोष्ट आहे. यावर मानवी जीवनाची संभावना होऊ शकते. हा ग्रह आकाराने पृथ्वी पेक्षा मोठा आहे. यावर घन वातावरण बघायला मिळाले आहे. या ग्रहावर जर मानवी जीवन शक्य असेल, तर प्रत्येकाला जायला नक्कीच आवडेल.

तरळ रूपात असू शकते पाणी –
लिजा कलटेनेगर म्हणाल्या की, या ग्रहावर पृथ्वीप्रमाणेच पाणी तरळ रूपात असू शकते. आम्ही टेलीस्कोपच्या मदतीने ग्रहावरील मानवी जीवनाचे काही संकेत मिळतात का याचा शोध घेत आहोत. याबद्दलची माहिती लवकरच ऑनलाईन प्रकाशित केली जाईल. ट्रांजिटिंग एक्सोप्लेनेट सर्वे सेटेलाईटद्वारे हे एक अंतरिक्ष सेटेलाईट आहे. नासाने याला ग्रहांचा शोध घेण्यासाठी 18 एप्रिल 2018 ला लाँच केले होते. हे सेटेलाईट दोन वर्ष काम करेल.

तीन ग्रहांचा शोध – 
एस्ट्रोनोमी अँड एस्ट्रोफिजिक्स नावाच्या जर्नलमध्ये स्पेनच्या इंस्टीट्यूट ऑफ एस्ट्रोफिजिक्स ऑफ द कैनरी आइलैंड आणि यूनिवर्सिटी ऑफ ला लागुनाच्या खगोल शास्त्राज्ञांनी सांगितले आहे की, जीजे 357 सिस्टिमचा शोध लावण्यात आले आहे. यामध्ये एकूण तीन ग्रह आहेत. ज्यामध्ये जीजे 357 डी ग्रहावर राहण्यासाठी अनुकूल परिस्थिती आहे. याचबरोबर एक छोटा जीजे 357 ग्रह देखील आहे. जो सुर्याच्या आकाराच्या एक तृतीयांश एवढा आहे.

पृथ्वी पेक्षा 22 टक्क्यांनी मोठा ग्रह –
फेब्रुवारीमध्ये टीईएस सैटेलाईटने शोध लावला होता की, जीजे 357 हा प्रत्येक 3.9 दिवसांनी मंद होत जातो. वैज्ञानिकांचे म्हणणे आहे की, हे या गोष्टीचे प्रमाण आहे की, याच्या आजुबाजूला कोणता तरी ग्रह फिरत आहे. नासाच्या गोडार्ड स्पेस फ्लाइट सेंटर नुसार, हा ग्रह जीजे 357 बी असून, तो पृथ्वीपेक्षा 22 टक्क्यांनी मोठा आहे.

बर्फाळ ग्रहावर देखील जीवन शक्य –
वैज्ञानिकांनी दावा केला आहे की, पृथ्वीच्या आकाराचे बर्फाळ ग्रहावरील काही भाग राहण्यासाठी योग्य असू शकतो. आतापर्यंत वैज्ञानिकांचे मत होते की, पृथ्वी सारख्या बर्फाळ ग्रहावर जीवन शक्य नाही. कारण त्या ग्रहांवरील महासागर गोठलेले आहेत आणि थंडीमुळे जीवन शक्य नाही. मात्र नवीन अभ्यास याच्या उलट आहे. जियोफिजिकल रिसर्च जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या नवीन अभ्यासानुसार, बर्फाळ ग्रहावर भूमध्ये रेखांशाजवळ राहण्यासाठी योग्य क्षेत्र असण्याची शक्यता आहे.

Leave a Comment