तुमच्याही व्हॉट्सअॅपवर ‘हा’ मेसेज आला असेल वेळीच सावधान व्हा


दररोज विविध प्रकारचे मेसेज सोशल मीडियामध्ये अग्रेसर असलेल्या व्हॉट्सॲपवर व्हायरल होत असतात. व्हॉट्सअॅपवर गेल्या काही दिवसांपासून एक मेसेज व्हायरल होत असून व्हॉट्सअॅपच्या दशकपूर्तीनिमित्त युजर्सला एक हजार जीबीचा डेटा मोफत दिला जाणार असा उल्लेख त्यामध्ये करण्यात आलेला आहे. पण, या मेसेजसोबत आलेल्या लींकवर क्लीक केल्यानंतर तुमच्या बँक खात्यातून काही रक्कम गायब होण्याची शक्यता आहे.

कंपनीने व्हायरल होणाऱ्या या मेसेजबाबत स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी या सर्व अफवा असल्याचे सांगितले आहे. असा कोणताही मोफत डेटा आमच्याकडून देण्यात येत नाही. व्हॉट्सअॅपवर व्हायरल होणाऱ्या अशा खोट्या मेसेज आणि लिंकपासून साधव राहा, आवाहनही कंपनीकडून करण्यात आले आहे. तुमच्या फोनमधील खासगी माहिती व्हायरल होणाऱ्या मेसेजमधील लिंकवर क्लीक केल्यास लिक होण्याची शक्यता आहे. तसेच युझर्सचे बँक डिटेल्स मिळवून फसवणूक होण्याचीही शक्यता असल्यामुळे अशा कोणत्याही व्हायरल मेसेजवर विश्वास ठेवू नये, असे कंपनीकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Leave a Comment