सोशल मीडियात व्हायरल होत आहे धोनीचा भारतीय लष्कराच्या कॅम्पमधील पहिला फोटो


नवी दिल्ली: दोन महिन्यांसाठी भारतीय लष्करासोबत भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनी हा काम करत आहे. लष्करात सेवा देण्यास त्याने बुधवारी सुरुवात केली. धोनीचा त्यातच भारतीय लष्कराच्या कॅम्पमधील पहिला फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

धोनीने टीम इंडियाच्या वेस्ट इंडिज दौऱ्यातून भारतीय सैन्याची सेवा करता यावी यासाठी माघार घेतली आहे. तसेच ज्या बटालियनमध्ये धोनी सहभागी होऊन पहारा देणार आहे, ती बटालियन विशेष सैनिकांची आहे. देशातील प्रत्येक विभागातून आलेले सैनिक यात आहेत. येथे दिवस आणि रात्र अशा शिफ्टमध्ये धोनीला काम करावे लागणार आहे. धोनीकडे यावेळी पाच किलो वजनाच्या 3 मॅग्जीन, 3 किलोचा पोशाख, 2 किलोचे बूट, 4 किलोचे 3 ते 6 ग्रेनेड, 1 किलोचे हॅल्मेट आणि 4 किलोचे बुलेटप्रुफ जॅकेट असे एकूण 19 किलो वजन असणार आहे.

धोनी व्हायरल झालेल्या या फोटोत लष्करी जवानांच्या ड्रेसमध्ये दिसत आहे. क्रिकेटचे मैदान गाजवणारा आपल्यासोबत काम करत असल्याने जवानांनी देखील आनंद व्यक्त केला आहे. तसेच त्यांच्याकडे असलेल्या बॅटवर त्यांना धोनीची स्वाक्षरी व त्याच्यासोबत फोटो घेण्याचा मोह देखील आवरता आलेला नाही. यावेळी 50-60 सैनिकांसोबत धोनी बंकरमध्ये राहणार आहे. लष्कराच्या पॅराशूट रेजिमेंटचा 38 वर्षीय धोनी सदस्य असून, लेफ्टनंट कर्नलपद त्याच्याकडे आहे. 2011साली भारतीय लष्कराने त्याला हा मान दिला. 2015मध्ये त्याने पॅराट्रुपरची परीक्षाही पास केली.

Leave a Comment