सेलिब्रेटी आणि चर्चा हे खूप जवळचे नाते आहे. त्यातच ते कधी काय करतील याचा काही एक भरवसा नाही. सध्याच्या घडीला छोट्या पडद्यावरील अभिनेत्रींमध्ये न्यूड योगा हा नवा ट्रेंड फोफावलेला दिसत आहे.
अभिनेत्री आकांक्षा गरोडिया ही नागिन मालिकेमुळे प्रसिद्धीच्या झोतात आली. त्याच दरम्यान तिने आपला न्यूड योग करतानाचा फोटो शेअर करून खळबळ उडवून दिली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून न्यूड योगाचे समर्थन करताना आकांक्षा गरोडियाने एक पोस्ट शेअर केली आहे.
नागिन या मालिकेमुळे आकांक्षा गरोडिया प्रसिद्धीच्या झोतात आली होती. या नव्या फोटोमुळे आता वेगळी चर्चा सुरू झाली आहे. ती न्यूड इज नॉर्मल असा हॅशटॅग लिहून त्याचे समर्थनही करताना दिसते आहे. या टॉपलेस योगामुळे आकांक्षाच्या अगोदर अबिगेल पांडे ही टीव्ही अभिनेत्री देखील चर्चेत होती. आता अबिगेलपाठोपाठ आकांक्षानेही तेच केले आहे.
एका टॉपलेस फोटोमुळे छोट्या पडद्यावरील अभिनेत्री अबिगेल पांडे चर्चेत आली. हा फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर आहे. या फोटोमध्ये अबिगेल टॉपलेस होऊन योग करताना दिसत आहे. तिने या सोबत एक खास कॅप्शनही दिले आहे. तुम्हाला जे विचार करायला भाग पाडते.
अबिगेलने याआधीही तिचे बिकिनीमधील योग करतानाचे फोटो शेअर केले होते. तिचे इन्स्टाग्राम पाहिल्यावर ती योगाबाबत किती जागरुक आहे हे दिसून येते. अबिगेलने तिच्या या टॉपलेस फोटोमध्ये तिचे दोन्ही हात पाठीमागच्या बाजूला परफेक्ट जोडलेले दिसत असून तिने या फोटोला दिलेल्या कॅप्शनमध्ये एका ‘Nude Yoga Girl’ नावाच्या एका अकाउंटचा उल्लेख केला आहे.
@nude_yogagirl कडून केल्या जाणाऱ्या या कामाची मी किती मोठी चाहती आहे, हे मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही. अनेकांना माहित असते की आकर्षक हेडलाइन आणि टायटल तुम्हाला स्वतःकडे आकर्षित करतात. पण कोणतेही पुस्तक त्याच्या कव्हरवरून आपण पारखू शकत नसल्याचे अबिगेलने म्हटले आहे.
अबिगेल पुढे लिहिते की, न्यूडिटी आणि योग याचा एकमेकांशी काहीही संबंध नसला तरी त्याचे कॉम्बिनेशन बरेच काही सांगून जाते. पण त्यांनाच हे सर्व कळेल तो अनुभव ज्यांनी घेतला आहे. अबिगेल म्हणते, मला सुरुवातीला खूप लाज आणि भीती वाटत होती. पण हे केल्यानंतर मला खूप मोकळे आणि स्वतंत्र वाटले. तिने यासोबतच याला #nuedisnormal असा हॅशटॅगही वापरला आहे.
अबिगेलने याधीही तिच्या इन्स्टाग्रामवर योगचे अनेक फोटो शेअर केले आहेत. जे सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले होते. याशिवाय तिच्या रिलेशनशिपमुळे खूप चर्चेत असते. अबिगेल डान्सर आणि कोरिओग्राफर सनम जौहरसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये असल्याचे म्हटले जाते.