विमानात एअर हॉस्टेसचे हे कृत्य बघून प्रवाशी झाले आश्चर्यचकित


दक्षिण पश्चिम एअरलाईन्समध्ये (Southwest Airlines) अशी काही घटना घडली की, ज्यामुळे सर्वच जण आश्चर्यचकित झाले.  एक एअर हॉस्टेस विमानच्या वरील कमपार्टमेंटमध्ये झोपलेली आढळून आल्याने, प्रवाशी देखील आश्चर्यचकित झाले. ट्विटरवर हा फोटो वेरोनिका लॉयडने शेअर केला आहे. विमान नॅशविलेवरून फिलाडेलफियाला जाणार होते. त्याचवेळी एअर हॉस्टेस वरील डब्यामध्ये असलेली आढळून आली.

वेरोनिका लॉयडने सोमवारी ट्विटरवर एअरलाईन्सला टॅग करत फोटो शेअर करताना लिहिले की, हे स्वप्न आहे का

वेरोनिकाने फोटोबरोबरच व्हिडीओ देखील शेअर केला.

वेरोनिका म्हणाली की, त्या महिलेच्या असे करण्याने मी आश्चर्यचकित झाले आहे. ती जवळपास 10 मिनिटे तेथे झोपून होती. मला वाटते ती, मस्करीच्या मूडमध्ये असेल. कदाचित प्रवाशांना हसवण्यासाठी ती असं करत असेल.

साउथ एअरलाईन्सने सांगितले की, आमचे कर्मचारी हास्य भावनेसाठी ओळखले जातात. एअर हॉस्टेसने जे केले ते त्याचाच एक भाग आहे. आमच्या कर्मचाऱ्यांनी प्रवाशांचे मनोरंजन करण्याचा प्रयत्न केला. आम्ही प्रवाशांच्या सुरक्षेची नेहमीच काळजी घेतो.

Leave a Comment