गाईच्या शेणापासून बनल्या सुंदर राख्या


भाऊ बहिणीच्या अतूट नात्याचे बंधन म्हणून श्रावणात राखी पौर्णिमा साजरी केली जाते. यावेळी बहिण भावाच्या हाताला राखी बांधते आणि भाऊ बहिणीला तिचे आमरण संरक्षण करण्याचे आश्वासन देतो. दरवर्षी या उत्सवाचे निमित्त साधून विविध प्रकारच्या, विविध डिझाईनच्या राख्या बाजारात येतात. त्यात सध्या गोंड्याच्या राखीपासून ते सोन्या चांदीच्या राख्यांपर्यंत विविध प्रकार असतात. यंदा मात्र त्यात नवी भर पडली असून पर्यावरण पूरक राख्या तयार केल्या गेल्या आहेत. या राख्या गोमय म्हणजे गाईच्या शेणापासून तयार केल्या गेल्या असून उत्तर प्रदेशातील बिजनोर येथील गोशाळेत त्या तयार केल्या गेल्या आहेत.

या राख्या देशी गाय लालसिंधीच्या शेणापासून तयार केल्या गेल्या आहेत. त्यासाठी गोमयला राखीचे विविध आकार देऊन ते वाळविले गेले, नंतर त्यावर सजावट केली गेली आहे आणि रेशीम धागा बांधला गेला आहे. या राख्यामुळे पर्यावरणाला नुकसान पोहोचणार नाही. काही दिवस हातावर ठेऊन नंतर त्या जमिनीत टाकून दिल्या तरी त्यामुळे जमिनीला खत मिळणार आहे.

या गोशाळेत ११७ गाई आहेत. त्यांच्या गोमयापासून येथे अनेक वस्तू बनविल्या जातात. इंडोनेशियातील नोकरी सोडून भारतात आलेल्या ५२ वर्षीय एनआरआय अलका कोठी यांनी बिजनौर येथील गोशाला पहिली तेव्हा त्यांना गोमयापासून

Leave a Comment