सद्गुरू जग्गी वासुदेव ‘हे फीवर’ने ग्रस्त, जाणून घेऊया या रोगाची लक्षणे


सुप्रसिद्ध आध्यात्मिक गुरु सद्गुरू जग्गी वासुदेव सध्या ‘हे फीवर’ नामक व्हायरल तापाने ग्रस्त आहेत. सध्या मेलबर्न, ऑस्ट्रेलियामध्ये सद्गुरूंचे वास्तव्य असून इथेच त्यांना या व्हायरल तापाने ग्रासले आहे. या तापाचे निदान आणि योग्य उपचार जर वेळशीर झाले नाहीत, तर याचे गंभीर परिणाम रुग्णाला भोगावे लागू शकतात. या व्हायरल तापाविषयी अधिक माहिती करून घेऊ या. ‘हे फीवर’ हा ताप व्हायरसच्या संक्रमणामुळे उद्भवत असून, यालाच ‘अॅलर्जिक रायनायटिस’ या नावानेही ओळखले जाते. हा व्हायरस धूळ, किंवा एखाद्या पाळीव प्राण्याच्या शरीरावरील केंसाच्या मार्फत मानवी शरीरामध्ये प्रवेश करू शकतो. या व्हायरसचे संक्रमण हवेतील बदलामुले ही होऊ शकते. म्हणूनच ऋतुमान बदलले, की या व्हायरसचे संक्रमण झाल्याने आजारी झालेले रुग्ण अधिकाधिक आढळू लागतात.

या व्हायरसचे संक्रमण झाल्याने अनेक तऱ्हेची लक्षणे आढळून येतात. घश्यामध्ये आणि तोंडामध्ये खाज सुटणे, डोळ्यांच्या खालची त्वचा निळसर दिसू लागणे, सतत शिंका येणे, भुवयांच्या वरच्या बाजूला आणि कपाळाच्या दोन्ही बाजूला सतत वेदना जाणविणे, नाक गळणे, किंवा बंद होणे, डोळ्यांमधून पाणी येणे, डोळे लाल होणे, खोकला येणे, आणि नाकामध्ये सतत खाज सुटणे, अशी लक्षणे या व्हायरसच्या संक्रमणामुळे जाणवू लागतात. हा ताप फार गंभीर स्वरूपाचा नसला, तरी या आजाराची लक्षणे सतत जाणवत असल्याने रुग्णाला शांत झोप लागणे कठीण होते. तसेच ज्या व्यक्तींना दम्याचा त्रास असेल, त्यांनाही या आजारामध्ये जास्त त्रास होण्याचा संभव असतो.

‘हे फिवर’ पासून बचाव करण्यासाठी काही खास उपाय करणे शक्य नसले, तरी या आजाराची लक्षणे जाणविल्यास त्वरित डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार घेणे आवश्यक आहे. तसेच पाळीव प्राणी, किंवा धूळ-माती ज्यांमुळे ही अॅलर्जी उद्भवू शकते, त्या गोष्टींपासून दूर राहावे. ऋतुमान बदलत असताना अॅलर्जी होऊ नये यासाठी घराबाहेर पडताना तोंडावर मास्क वापरावा. पाळीव प्राण्यांना हात लावल्यानंतर किंवा बाहेरून घरामध्ये आल्यानंतर हात-पाय स्वच्छ धुवावेत.

Leave a Comment