चार्जिंग स्टेशनसाठी सरकार देणार सबसीडी, तुम्हीही करू शकता अर्ज


केंद्र सरकार इलेक्ट्रिकल कारची विक्री वाढवण्यासाठी देशभरात चार्जिंग नेटवर्क सुरू करणार आहेत. चार्जिंग स्टेशन सुरू करण्यासाठी आता सरकार आर्थिक मदत देखील करणार आहे. भारत सरकारच्या अवजड उद्योग मंत्रालयाला यासंबंधी जबाबदारी देण्यात आलेली आहे. चार्जिंग स्टेशन लावण्यास इच्छूक अलेल्या व्यक्ती मंत्रालयाशी संपर्क करू शकतात.

पहिल्या टप्प्यात 1000 चार्जिंग स्टेशन –
पहिल्या टप्प्यात देशभरात 1000 चार्जिंग स्टेशन लावले जाणार असून, प्रत्येक चार्जिंग स्टेशनवर सहा चार्जर असतील. या एक हजार स्टेशनवर एकाच वेळी 6 हजार गाड्या चार्ज केल्या जाऊ शकतील. यामधील काही स्टेशनवर फास्ट चार्जरची देखील सोय असेल.

ऑनलाईन सुविधा –
मंत्रालयानुसार, या चार्जिंग स्टेशनला कोणत्याही खाजगी अथवा सार्वजनिक ठिकाणी लावले जाऊ शकते व सरकार त्यासाठी सबसीडी प्रदान करेल. तसचे यासाठी अट असेल की, स्टेशनवर ऑनलाईन सुविधा द्यावी लागेल. जेणेकरून ग्राहक ऑनलाईन पेमेंट करू शकतील. चार्जिंगसाठी विजेची सुविधा कुठल्याही विज डिस्ट्रीब्युशन कंपनीद्वारे घेतली जाऊ शकते.

20 ऑगस्ट अंतिम तारीख –
स्टेशनवरील तीन फास्ट चार्जर हे अर्ध्या तासात गाडी पुर्ण चार्ज करतात. चार्जिंग स्टेशनसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 20 ऑगस्ट असून, निवडलेले अर्जदार 9 महिन्यांच्या आत सेटअप तयार करावा लागेल. तसेच चार्जिंग स्टेशन सुरू करण्यासाठी अंतिम निर्णय हा वीज वितरण कंपनीचा असेल.

नोएडामध्ये 100 चार्जिंग स्टेशन  –
सर्वाधिक चार्जिंग स्टेशन हे 20 ते 40 लाख लोक संख्या असणाऱ्या शहरांमध्ये लावले जातील. उत्तर प्रदेशच्या नोएडा जिल्ह्यात चार्जिंग स्टेशनचे काम सुरू आहे. नोएडामध्ये 100 चार्जिंग स्टेशन लावण्यात येणार आहे.

सध्या दिल्ली –एनसीआरमध्ये सर्व सामान्य जनतेसाठी 20 चार्जिंग स्टेशन्स आहेत. तसेच सरकारी गाड्यांना चार्ज करण्यासाठी पंतप्रधान कार्यालयात सर्वाधिक 15 चार्जिंग स्टेशंस आहेत. त्यानंतर नीति आयोग आणि वित्त मंत्रालयात 10, संसद भवनात सात, उर्जा मंत्रालय 5, पर्यावरण मंत्रालय 5, राष्ट्रपती भवन 4, विदेश मंत्रालयात 3 आणि दिल्लीतील गुजरात भवनात 2 चार्जिंग स्टेशंस आहेत.

सध्या भारतात 150 चार्जिंग स्टेशन  –
चीनमध्ये कार चार्जिंग स्टेशंसची संख्या 10 लाखांवर पोहचली आहे. तर भारतात सध्या 150 चार्जिंग स्टेशन आहेत. चीनमध्ये सार्वजनिक चार्जिंग स्टेशनची संख्या 4.12 लाख एवढी होती तर चार्जिंग पोस्ट्सची संख्या 5.91 एवढी आहे. केवळ एका वर्षात चार्जिंग स्टेशनच्या संख्येत 69 टक्क्यांनी वाढ झालेली आहे.

सरकार बनवत आहेत दोन इलेक्ट्रिक हायवे –
सरकार सध्या इलेक्ट्रिक गाड्यांसाठी दोन हायवे कॉरिडोरचे मार्च 2020 पर्यंत काम सुरू करण्यावर भर देत आहे. या कॉरिडोर्सवर बॅटरी चार्ज करण्याची सुविधा असेल. हे कॉरिडोर्स दिल्ली – जयपूर आणि दिल्ली – आग्रा हायवेवर बनणार आहेत.

Leave a Comment