इस्रोने एवढे उत्पन्न करत देशाचा करुन दिला फायदा


नवी दिल्ली – सध्या जगभरात भारतीय अतंराळा संशोधन संस्था असलेल्या इस्रोच्या चांद्रयानाची कामगिरीचे जगभरात कौतुक होत आहे. पण केवळ संशोधनच नव्हे तर व्यावसायिक पातळीवरही इस्रोने यश मिळवून देशाचा फायदा करून दिला आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेची (इस्रो) अँट्रिक्स कॉर्पोरेशन ही व्यावसायिक संस्था आहे. २३९ उपग्रहांचे प्रक्षेपण करून या कंपनीने ६ हजार २८९ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळविले आहेत.

इस्रोच्या आर्थिक कामगिरीची माहिती लोकसभेत पंतप्रधान कार्यालयाचे मंत्री जितेंद्र सिंह यांनी दिली. न्यूस्पेस इंडिया लिमिटेडची (एनएसआयएल) स्थापना अँट्रिक्स कॉर्पोरेशनच्या जागी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. अंतराळ विभागाच्या अखत्यारीत न्यूस्पेस इंडिया लिमिटेड ही कंपनी येते. इस्रोकरता या कंपनीकडून व्यावसायिक संशोधन आणि विकास करण्यात येत असल्याचे जिंतेद्र सिंह यांनी सांगितले.

अंतराळ बाजारपेठेचा जागतिक पातळीवर विकास होत आहे. या बाजारपेठेची व्यावसायिक मागणी लक्षात घेवून एनएसआयएलकडून यंत्रणा तयार करण्यात आली आहे. भारतीय उद्योगाचाही अंतराळ क्षेत्रात विकास होईल, असा त्यांनी विश्वास व्यक्त केला. भारत हा तंत्रज्ञानाच्या दृष्टीने अंतराळ क्षेत्रात शक्ती असलेला महत्त्वाचा देश होत असल्याचे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर करताना म्हटले होते. कारण कमी खर्चात उपग्रहांचे प्रक्षेपण करण्याची इस्रोकडे क्षमता आहे.

Leave a Comment