‘इन टू द वाइल्ड’ बसपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिलेचा मृत्यू


अलास्का येथील डेनाली नॅशनल पार्क येथे हायकिंग करत रिकाम्या बसपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका महिलेचा नदीत वाहून जाऊन मृत्यू झाला आहे. ही बस प्रसिध्द पुस्तक आणि चित्रपट ‘इन टू द वाइल्ड’ यामुळे चर्चेत आली होती.

24 वर्षीय बेलारूसची महिला वैरामिका मायकौवा ही पती पिओत्र याच्याबरोबर तेक्लिनिका नदी पार करण्याचा प्रयत्न करत होती. मात्र ती नदीत ओढली गेली. याच ठिकाणी 1992 मध्ये हायकर ख्रिस्टोफर मॅक्नेंडल्सचा देखील मृत्यू झाला होता.

नदीच्या दोन्ही साईडला हायकरसाठी दौऱ्या लावण्यात आलेल्या आहेत. ज्याद्वारे ते नदी ओलांडू शकतात. मात्र हे दोघेही पती-पत्नी नदी ओलांडत असताना, नदीच्या पाण्याची पातळी अधिक होती. त्यामुळे नदी ओलांडत असताना, तिचा पाय घसरला आणि तोल गेल्यामुळे पडली.

या मॅजिक बस पर्यंत पोहचण्यासाठी हजारो लोक दरवर्षी येत असतात. 24 वर्षीय मेक्नेंडल्सने मृत्यूच्या आधी या बसचा राहण्यासाठी वापर केला होता. तसेच यावर मृत्यू होण्याआधी त्याने डायरी देखील लिहिली होती. याचवर जॉन क्रकुअरने पुस्तर लिहिले होते व 2007 मध्ये चित्रपट आला होता.

2010 मध्ये देखील एक स्विर्झलंडच्या महिलेचा अशाच प्रकारे मृत्यू झाला होता तर अन्य काही जणांचे बाहेर काढण्यात आले होते. मृत्यू झालेल्या वैरामिका मायकौवा महिलेचा एक महिन्यापुर्वीच लग्न झाले होते.

Leave a Comment