तुम्ही पाहिला आहे का त्या निवडणूक महिला अधिकाऱ्याचा टीक-टॉक व्हिडीओ


तुमच्या लक्षात आहेत का काही महिन्यापूर्वी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकी दरम्यान एक पिवळ्या साडीतील निवडणूक अधिकारी असलेल्या रिना द्विवेदी प्रकाश झोतात आल्या होत्या. त्यांची क्रेझ निवडणुकीनंतरही सर्वत्र वाढत गेली. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर त्यांचे फोटो व्हायरल झाले होते. उत्तर प्रदेशातील देवरियामधील मतदार संघातून रिना यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. त्यांनी त्यावेळी मतदान केंद्रावरील अधिकाऱ्यांसोबत सेल्फी देखील घेतला. मतदानाकरता आपल्या सासरी देवरिया येथे लखनऊमध्ये राहत असलेल्या रिना द्विवेदी दाखल झाल्या. त्यांनी त्यावेळी सर्वांनी मतदानाचा हक्क बजावा असे आवाहन केल्यानंतर आता रीना यांचा एक टीक-टॉक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने त्या आता पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत.

सध्या सोशल मीडियावर रिना द्विवेदी यांचा एक टीक-टॉक व्हिडिओ व्हायरल होत आहे. रिना यांचा या व्हिडिओमधील डान्स हरियाणाची डान्सर सपनी चौधरीची कॉपी म्हटले जात आहे. रिना या व्हिडिओमध्ये हिरव्या साडीमध्ये सपना चौधरीप्रमाणे डान्स स्टेप करताना दिसत आहे. त्या यामध्ये सपनाचे ‘तेरी आख्या का काजल’ या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. हा व्हिडिओ सर्वांच्या पसंतीत उतरत आहे. कोणत्यातरी लग्नात हा व्हिडिओ शूट करण्यात आला आहे. रिना ज्यामध्ये कोणत्याही अभिनेत्री पेक्षा कमी दिसत नाही. रिना यांनी या व्हिडिओमध्ये सपनापेक्षाही चांगला डान्स केल्याचे काहींचे म्हणणे आहे.

रिना द्विवेदी यांचे सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स आहेत. भोजपुरी चित्रपटाच्या ऑफर्स देखील त्यांना आल्या होत्या. त्यांनी चित्रपटाच्या ऑफर्स पतीच्या मृत्यूनंतर मुलाच्या जबाबदारीमुळे नाकारल्या, पण, बॉलिवूडमध्ये काम करण्याची संधी मिळाल्यास स्वीकारणार असल्याचे रिना सांगतात. त्यांना लहानपणापासून फिटनेस आवडतो. सुदंर दिसणाऱ्या रिना यांना 13 वर्षाचा मुलगा आहे. रिना या सलमान खानच्या खूप मोठ्या फॅन आहेत. 2013मध्ये रिना यांच्या पतीचे निधन झाले. त्यांना पतीच्या निधनानंतर सार्वजनिक बांधकाम विभागात नोकरी मिळाली. त्यांचा मुलगा दहावीमध्ये असून त्याला आयएएस व्हायचे आहे. तो सध्या लखनऊमध्ये शिक्षण घेत आहे.