टींडरने समलैंगिक युजर्ससाठी लॉन्च केले नवे सेफ्टी फिचर


सध्या डेटिंगसाठी सोशल मीडियात तरुणाईसाठी विविध अॅप सुरु करण्यात आले आहेत. अॅपच्या माध्यमातून एखाद्या अनोळखी व्यक्तीला आपल्याला ती व्यक्ती आवडली आहे असे दर्शवणारे एक फिचर देण्यात येते. तरुणाईमध्ये त्यामुळेच ऑनलाईन डेटिंग अॅप ट्रेंन्ड बनला आहे. यामधीलच एक ग्लोबल ऑनलाईन डेटिंग अॅप टिंडरने एक नवे Traveller Alert नावाचे फिचर आणले आहे.

ऑनलाईन डेटिंगसाठी टिंडरच्या मदतीने वाव मिळाला आहे. दोन अनोळखी व्यक्ती या अॅपच्या मदतीने एकमेकांशी संवाद साधू शकत होते. पण टिंडरने समलैंगिक युजर्ससाठी एक नवे सेफ्टी फिचर लाँच केले आहे. टिंडरच्या मते विविध देशातील समलैंगिक नातेसंबंध असणाऱ्या व्यक्तींच्या नात्याची गुप्तता पाळणे असा सेफ्टी फिचर मागचा उद्देश आहे. पण अद्याप जगभरातील काही देशात समलैंगिक नातेसंबंधाला मान्यता देण्यात आलेली नाही.

तर ‘ट्रॅव्हलर अलर्ट’ असे नाव या नव्या फिचरसाठी देण्यात आले आहे. तर समलैंगिक व्यक्ती या फिचरच्या सहाय्याने ज्या देशात ऑनलाईन डेटिंगसाठी याचा उपयोग करेल, त्यावेळी तेथील समलैंगिक व्यक्ती कशा पद्धतीने समस्यांचा सामना करत आहेत हे कळणार आहे. तसेच काही गोष्टींबाबत टिंडरवरील समलैंगिक युजर्सनी सावधानी बाळगणे अत्यावश्यक आहे. कारण समलैंगिक संबंध अन्य काही देशात अनिवार्य असल्याने काही समस्यांचा सामना करावा लागण्याची शक्यता असल्याने काही गोष्टींबद्दल गुप्तता ठेवणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आहे. सेफ्टी फिचर अॅन्ड्रॉइड आणि आयओएससाठी सुद्धा उपलब्ध करुन देण्यात आले आहे.

Leave a Comment