निलंबित केल्यानंतरही महिला पोलीसाचे टिक-टॉक सुरुच


गुजरातमधील पोलिस ठाण्यात टिक-टॉक व्हिडिओ तयार करणाऱ्या पोलिस अल्पिता चौधरी यांना निलंबित करण्यात आले आहे. मेहसाणा जिल्ह्यातील लंगनज पोलीस ठाण्यात लोक रक्षक दलामध्ये (एलआरडी) कार्यरत असलेल्या अल्पिता चौधरी यांनी लॉकअपसमोर नाचतानाचा एक छोटा व्हिडिओ तयार केला. त्यांचा डान्स इतका व्हायरल झाला की तो सगळीकडे पाहिला गेला. हा व्हिडिओ फेसबुक, व्हॉट्सअॅप आणि ट्विटरवर व्हायरल झाला. निलंबित अल्पिता चौधरी आता टिक-टॉक स्टार बनल्या आहेत. कालपर्यंत त्यांच्याकडे 14 हजार चाहते होते. आज त्यांच्याकडे 35 हज़ारपेक्षा जास्त चाहते आहेत.

त्यांचा तो व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये अल्पिता चौधरी सलमान खानच्या ‘किक’ चित्रपट ‘तू ही तू’ वर नाचत आहेत. हा व्हिडिओ टिक-टॉककडून जरी डिलीट करण्यात आला असला तरी त्यापूर्वीच तो व्हायरल झाला होता.


अल्पिता चौधरी यांचे टिकटॉक अकाऊंट आहे, ज्यामध्ये त्या खूप सक्रिय आहे. तेथे त्यांचे बरेच व्हिडिओ आहेत. त्यांचे @ anaa_queen_2117 नामक त्यांचा युझर आयडी आहे. पण आम्ही सांगू इच्छितो की कालपर्यंत,त्यांच्याजवळ 14 हजार चाहते होते, परंतु आज त्यांच्याकडे 35 हजार पेक्षा जास्त चाहते आहेत. त्याच वेळी, 55 हजार हर्ट्स होते ते आता 1 लाख 48 हजार झाले उपस्थित होते. तसेच, त्यांनी आपल्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की जर तुम्ही आता टिक-टॉकवर आलाच आहात तर तर तुम्ही युट्यूबवर देखील थोडी नजर मारा * अल्पिता क्वीन *

जेव्हा त्यांचा युट्यूब पाहिले तेव्हा त्यांनी तेथे व्हिडिओ शेअर केला. ज्यात ते असे म्हणत आहेत – “अहो, आमच्यावर जळणारे देखील कमाल करत आहेत. पार्टी तुमची, मित्र तुमचे आणि चर्चा मात्र आमच्या नावाची करता… ”

अधिकाऱ्याने सांगितले की, अल्पिता चौधरी यांनी 20 जुलै रोजी विवादित व्हिडिओ तयार केला होता, जो आता सोशल मीडिया साइट्स आणि व्हाट्सअॅपवर व्हायरल झाला आहे. डीएसपींनी सांगितले की, वर्ष 2016 मध्ये महिला पोलिस अधिकारी म्हणून अर्पिता चौधरी यांना लोक रक्षा दलामध्ये पदच्युत करण्यात आले होते, त्यानंतर 2018 मध्ये त्यांना मेहसाणा येथे पोस्टिंग मिळाली होती.

Leave a Comment