शेतकरी मोबाईल रिचार्ज फेक बातमीवर शरद पवार यांचा तातडीने खुलासा


एके काळी केंद्रीय मंत्रिमंडळात कृषी खात्याची जबाबदारी सांभाळलेले आणि शेतकरी प्रश्नाबाबत सदैव जागरूक असलेले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार एका फेक मेसेज मुळे चांगलेच अडचणीत आले आहेत. या प्रकरणी पवार यांनी त्याच्या ट्विटर अकौंटवरून तातडीने खुलासा केला असून हा फेक मेसेज कुणी पसरवला याचा शोध घ्यावा म्हणून सायबर सेल पोलिसात तक्रार नोंदविली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार शरद पवार यांच्या नावाने एक मेसेज व्हॉटस अपवर दिला गेला असून तो प्रचंड वेगाने व्हायरल झाला आहे. त्यामुळे शरद पवार यांना धक्का बसला आहे. या संदेशात महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागातील सर्व शेतकऱ्यांचे मोबाईल रिचार्ज बिल शरद पवार भरणार आहेत असे लिहिले गेले आहे. हा मेसेज मराठी भाषेत आहे. सोशल मिडीयावर हा मेसेज वेगाने सर्क्युलेट होत आहे. यावर प्रतिक्रिया देताना शरद पवार यांनी हा संदेश चुकीचा आहे, अफवांवर विश्वास ठेऊ नका असे आवाहन करतानाच हा मेसेज कुणी व्हायरल केला याची कल्पना नाही असा खुलासा केला आहे.

पवार यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकौंटवर माझ्या नावे खोटा संदेश प्रसारित केला जात असून काही समाजकंटक पिडीत शेतकरयांची टर उडवीत आहेत, असल्या अफवांवर विश्वास ठेऊ नका असे म्हटले आहे.

Leave a Comment