गणेश प्रेमातून स्पेशल नंबर घेतला, पण घोटाळा झाला


आपल्या कार्स साठी प्रचंड पैसे मोजून स्पेशल नंबर मिळविणारे अनेक रसिक आहेत. पण तब्बल १९ लाख रुपये मोजून स्पेशल नंबर मिळवून निराळीच अडचण सोसण्याची वेळ गुजराथच्या राजकोट मध्ये राहणारे बांधकाम व्यावसायिक गोविंद परसाना याच्यावर ओढविली आहे.

परसाना गणेश भक्त आहेत. त्यांनी नवी मर्सिडीज खरेदी केली असून त्यासाठी लिलावात जेम्स बॉंड सिरीज मधला ०००७ नंबर खरेदी करण्यासाठी तब्बल १९ लाख १० हजार रुपये मोजले. परसाना बॉंडचे चाहते नाहीत तरीही त्यांनी राजकोट प्रादेशिक परिहवन कार्यालयाकडे ही रक्कम मोजली त्याचे कारण वेगळे होते. परसाना इतकी रक्कम मोजून हा नंबर खरेदी करणारे राजकोट मधले पहिले कारमालक ठरले आहेत. पण त्यांना हाच नंबर हवा होता कारण ७ हा आकडा गुजराथी भाषेत लिहिला तर त्यातून गणेश प्रतिमा दिसते असे त्यांचे म्हणणे आहे.खरी अडचण पुढेच आहे. परसाना यांना हा नंबर मिळाला खरा पण राजकोट प्रादेशिक परिवहन मंडळाने हा नंबर गुजराथी भाषेत लिहिता येणार नाही असे कळविले आहे.

जेम्स बॉंड सिरीज नंबर कार मालकांमध्ये विशेष लोकप्रिय आहेत. आणि पारसना जेम्स बॉंडचे चाहते नाहीत ही त्यांची दुसरी अडचण आहे.

Leave a Comment