टीक-टॉक व्हिडीओ महिला पोलिसाला पडला महागात


मेहसाणा – सध्या टीक-टॉकवर गुजरातमधील मेहसाणा पोलीस ठाण्यातील महिला पोलीसचा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत असून त्या महिला पोलिसाला ठाण्यात टीक-टॉक व्हिडीओ केल्यामुळे निलंबित करण्यात आले आहे. त्या महिला पोलीसाचे नाव अर्पिता चौधरी असे आहे.


अर्पिता चौधरी मेहसाणामधील लगंनज येथील पोलीस ठाण्यात ड्युटीवर होत्या. त्यांनी त्यावेळी टीक-टॉकवर व्हिडिओ केला. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्यांना निलंबित करण्यात आले आहे. पोलिसांनी कामावर असताना संयमाने काम केले पाहिजे असे, मेहसाणाचे डीवायएसपी (DYSP) मंजीत वणझारा यांनी म्हटले आहे. टीक-टॉक या अ‍ॅपची सध्या तरुणाईमध्ये प्रचंड क्रेझ पाहायला मिळत आहे. अनेक जण प्रसिद्धीसाठी विविध विषयांवरील आक्षेपार्ह व्हिडीओ पोस्ट करत असतात.

Leave a Comment