या पठ्ठ्याने 3 कोटींना खरेदी केले चक्क वापरलेले बुट


हौसेला मोल नसते अशा अर्थाची म्हण आपल्याकडे प्रचलित आहे. आपली हौस पूर्ण करण्यासाठी अनेकजण हवे तवेढे पैसे देखील खर्च करायला तयार असतात. त्यामागे त्यांचा आवडीची वस्तू मिळवणे हेच उद्देश्य असते, मग त्याची किंमत कितीही असो. नाइकीचे शूज अशाच एका व्यक्तीला पसंत आले. पण त्याने विकत घेतलेले शूज हे काही सामान्य शूज नव्हते. १९७२ मध्ये हे शूज तयार करण्यात आले होते. त्या व्यक्तीने तब्बल ३ कोटी रूपये या शूजसाठी मोजले.


Nike Moon Shoes असे या शूजच्या पेअरचे नाव आहे. नुकताच न्यूयॉर्कमध्ये या शूजचा लिलाव करण्यात आला. ४३७, ५०० डॉलर एवढी याची किंमत ठेवण्यात आली होती. भारतीय करन्सीनुसार ही किंमत ३,०१,८८,३७५.०० एवढी होते.

हे शूज कॅनडात राहणाऱ्या माईल्स नडाल नावाच्या बिझनेसमन व्यक्तीने विकत घेतले. त्याचबरोबर या व्यक्तीचे एक वैयक्तिक संग्रहालय सुद्धा आहे. हे शूज ते त्यातच ठेवणार आहेत. त्यांच्याकडे १४२ अ‍ॅंटिक कार देखील आहेत. तर ४० जुन्या बाइक्सही आहेत. जुन्या वस्तुंवर माइल्स यांचे फार प्रेम असल्यामुळे या शूजसाठीही त्यांनी ३ कोटी रूपये दिले.

नाइकी ब्रॅन्डच्या इतिहासातील Moon Shoe एक महत्त्वाचे प्रॉडक्ट होते. हे शूज नाइकीचे को-फाउंडर बिल बोवरमॅनने डिझाइन केले होते. १९७२ मध्ये ऑलम्पिक दरम्यान रनर्ससाठी हे शूज तयार करण्यात आले होते.

केवळ १२ शूज या मॉडलचे तयार करण्यात आले होते. माइल्स म्हणाले की, मला फार आनंद झाला की, नाइकीने शूजच्या विश्वात एक दुर्मिळ शूजची निर्मिती केली होती. खेळांचा इतिहास, कला आणि पॉप कल्चरचे यातून दर्शन होते. मी याआधी शूजचे ९९ पेअर खरेदी केले होते, मला तेव्हा वाटले होते की, असेच एक वेगळे कलेक्शन नाइकीकडे शिल्लक आहे. आणि नेमके तेच झाले.

प्रसिद्ध बास्केटबॉल खेळाडू मायकल जॉर्डनने साइन केलेला एक शूज २०१७ मध्ये विकला गेला होता. Converese चा हा शूज होता. याची किंमत त्यावेळी १९०, ३७३ डॉलर होती. भारतीय करन्सीनुसार ही रक्कम १, ३१,३७,९२६.२९ रूपये होते. या शूजचा सर्वात जास्त किंमत मिळण्याचा रेकॉर्ड नाइकीच्या शूजने तोडला आहे.

Leave a Comment