आता ड्रोनच्या मदतीने करता येणार पिकांवर कीटकनाशकांची फवारणी


आता पिकांवर ड्रोनच्या साह्याने कीटकनाशकाची फवारणी करता येणार आहे. आयआयटी मद्रासच्या विद्यार्थ्यांनी असे ड्रोन बनवले आहे जे आपण हाताने फवारणी करतो त्या पेक्षा 10 पट वेगाने कीटकनाशकाची फवारणी करू शकते. या ड्रोनला ‘एग्रीकॉप्टर’ असे नाव देण्यात आले आहे. एग्रीकॉप्टरवर लावण्यात आलेल्या कॅमेऱ्याच्या मदतीने पिकांवर देखील लक्ष ठेवता येणार आहे.

आयआयटी मद्रासच्या सेंटर फॉर इनोवेशनच्या संशोधनकर्त्यांनुसार, स्वतः हाताने कीटकनाशकांची फवारणी केल्याने लोकांच्या आरोग्याला धोका निर्माण होतो. शेतकऱ्यांवर होणारा विषारी रसायनांचा वाईट प्रभाव थांबवण्यासाठी या ड्रोनची निर्मिती करण्यात आली आहे.

एअरोस्पेस इंजिनिअरिंगचा विद्यार्थी ऋषभ वर्मा नुसार, ड्रोनमध्ये लावण्यात आलेला अत्याधुनिक कॅमेरा पिकांवर लक्ष ठेवून त्याआधारावर शेतीचे स्मार्ट मॅप बनवण्यास मदत करतो. यामध्ये ऑटोमॅटिक कीटकनाशक रिफिलिंग सिस्टिम लावण्यात आलेली आहे. ज्यामुळे कीटकनाशकाची फवारणी सतत सुरू राहते.

एग्रीकॉप्टरला पेटंट करण्यासाठी अर्ज करण्यात आलेला आहे. या ड्रोनला तयार करण्यासाठी 5.1 लाख रूपयांचा खर्च आला. एअरोस्पेसचा विद्यार्थी कवी कैलाशनुसार, या एग्रीकॉप्टरमध्ये 15 लीटर कीटकनाशके घेऊन जाण्याची क्षमता आहे. यामुळे 10 पट अधिक तेजीने फवारणी करता येईल व खर्चही वाचेल.

एग्रीकॉप्टर तयार करणाऱ्या टीमने इंडियन इनोवेशन ग्रोथ पुरस्कार देखील मिळवला आहे. हा कार्यक्रम मागील महिन्यात आयआयटी बॉम्बे येथे आयोजित करण्यात आला होता. पुरस्कारमध्ये टीमला 10 लाख रूपये देण्यात आले होते.

Leave a Comment