स्कॉटलंडच्या या बेटावर आहे जगातील एकमात्र विमानतळ


स्वतःच एक वैशिष्ट्य असे स्कॉटलंडच्या बारा द्वीप येथील विमानतळ आहे. उत्तर अटलांटिक महासागराच्या तटावर असलेल्या विमानतळावर रनवे नाही. विमानाचे येथे समुद्र किनाऱ्यावरच लँडिंग करण्यात येते. याठिकाणी विमानाची लँडिंग लाटांची भरती आल्यानंतर थांबवण्यात येते.

बारा जगातील एकमात्र असे विमानतळ जेथे शेड्यूल फ्लाइट्स लँड करतात. ग्लासगो एअरपोर्टसोबत हे विमानतळ जोडलेले आहे. एअरपोर्ट समुद्री वादळादरम्यान बंद करण्यात येऊन येथील उड्डाणे रद्द केली जातात. बारा एअरपोर्टवर जास्त करून लहान विमाने (20 मीटर) उतरतात. स्कॉटिश एअरलाइनचे येथे दररोज दोन फ्लाइट्स येत असतात.

हि विमाने किनाऱ्यावरील वाळूवरच उतरवली जातात. कोणत्याही प्रकारचा रनवे याठिकाणी तयार करण्यात आलेला नाही. किनाऱ्याजवळ टर्मिनलसाठी एक छोटीशी इमारत उभारण्यात आली आहे. एअरक्राफ्टहून इमारतीपर्यंत जाण्यासाठी कोणत्याही प्रकारचा पूल किंवा धावपट्टी निर्माण केलेली नाही.

Leave a Comment