अंतराळात कुठे बरे अंतराळवीर करत असतील ‘लघुशंका’?


सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असलेल्या ट्विटरवर मेरी कोवेल या अमेरिकन लेखिकेने केलेले काही ट्विट सध्या चर्चेचा चांगला विषय ठरत आहे. मेरीने अंतराळवीर अंतराळामध्ये लघुशंका कशी आणि कुठे करतात, यासंदर्भातील एक दोन नाही तब्बल २७ ट्विटस केले आहेत. अंतराळामध्ये लघुशंका करताना येणाऱ्या अडचणी आणि त्यावर कशी मात मिळवली जाते याबद्दलचे मजेदार किस्से आणि माहिती या ट्विटसमध्ये देण्यात आली आहे.


‘द न्यू यॉर्क टॉइम्स’साठी एक निबंध मेरीने लिहिला होता, त्यावेळीच तिला या प्रकारचे ट्विट करण्याची कल्पना सुचली. स्त्री-पुरुष भेदभाव नासाच्या अवकाश संशोधन कार्यक्रमामध्ये कशाप्रकारे केला जातो, यासंदर्भात ‘टू मेक इट टू द मून वुमन हॅव टू एस्केप अर्थस जेंडर बायस’ या मथळ्याखाली मेरीने निबंध लिहिला होता. मेरीने १९६९ साली आखण्यात आलेली चंद्र मोहिम ही ‘पुरुषांनी पुरुषांसाठी आखलेली मोहीम’ होती असा आरोप यामध्ये केला आहे. मेरीवर अनेकांनी या निबंधावरुन टिका केली आहे. १९६९ मध्ये शून्य गुरुत्वाकर्षणामध्ये महिलांनी लघुशंका कशापद्धतीने करावी यासाठीचे तंत्रज्ञान विकसित झाले नव्हते म्हणून अवकाशात महिला अंतराळवीरांना पाठवण्यात आले नव्हते असे टिकाकारांनी म्हटले आहे. मेरीने याच टिकेनंतर आपला मुद्दा मांडण्यासाठी २७ ट्विटस केले आहेत.

Leave a Comment