रोलर कोस्टर बंद पडल्याने 100 फुट उंचावर उलटी लटकली लोक


इंग्लंडमधील अल्टॉन टॉवर येथील द स्माईलर हा रोलर कोस्टर बंद पडल्याने त्या असलेले प्रवाशी तब्बल 100 फुट उंचावर लटकत असल्याची घटना घडली आहे. मंगळवारी सायंकाळी 6 वाजता ही घटना घडली. द स्माईलर नावाचा हा स्टीलचा रोलर कोस्टर स्टॅफोर्डशायर येथील अल्टॉन टॉवर थिम पार्क येथे आहे.


व्हिडीओमध्ये दिसून येते की, रोलर कोस्टरबंद पडल्याने त्यातील प्रवाशी आकाशाच्या दिशेने डोकवर करून लटकलेले आहेत.

प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, जवळपास 20 मिनिटे ही लोक उलटी लटकलेली होती. रोलर कोस्टर पुन्हा सुरू होईपर्यंत अनेक लोकं भितीने ओरडत होती. या घटनेत एकही व्यक्ती जखमी झालेला नाही.

अल्टॉन टॉवरचे प्रवक्ते म्हणाले की, या घटनेबद्दल आम्ही सर्व प्रवाशांची माफी मागतो. आमचे अधिकारी रोलर कोस्टरमध्ये असलेल्या सर्व प्रवाशांशी संवाद साधत असून, त्यांना झालेल्या अडचणीबद्दल आम्ही त्यांना फ्रीमध्ये पार्कचे तिकीट देखील देत आहोत. तसेच तांत्रिक अडचणीची तपासणी करण्यात येत असून, येणाऱ्या प्रवाशांना कोणतीही अडचण येऊ नये याची आम्ही काळजी घेत आहोत.

या रोलर कोस्टरची 2013 ला सुरूवात झाल्यापासूनच अनेक अडचणी आलेल्या आहेत. 2015 मध्ये येथील दोन ट्रेनची टक्कर झाली होती. या घटनेत अनेक लोक जखमी झाले होते.

Leave a Comment