शोएब अख्तरने पाकिस्तानमध्ये दाखवले हिंदू मंदिर


अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाईट हाऊस येथे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत काश्मीर प्रश्नावर दोन्ही देशांमध्ये मध्यस्थी करण्याचा प्रस्ताव दिला होता. मात्र भारताने ट्रम्प यांचे विधान खोटे असल्याचे म्हटले आहे. आता पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तरने पाकिस्तानमधील हिंदू मंदिर लोकांना दाखवले असून, त्याबद्दल माहिती देखील दिली आहे. त्याने इस्लामाबाद आणि लाहौर येथे केलेल्या प्रवासाचा व्हिडीओ युट्यूबवर अपलोड केला आहे.

पाकिस्तानमधील पंजाब प्रांतात कलार कहार येथे भगवान शंकराचे मंदिर आहे. या जागेचे नाव ‘कटास राज मंदिर; असे आहे. इतिहासकारांनुसार, या जागेला शिव नेत्र असल्याचे म्हटले जाते. जेव्हा देवी पार्वती सती गेल्या त्यावेळी भगवान शंकरांच्या डोळ्यामधून दोन अश्रू टपकले. एक अश्रू कटासवर टपकले, जेथे अमृत निर्माण झाले. हा अमृत कुंड तीर्थ स्थान कटास राज म्हणून आजही अस्तित्वात आहे.

शोएब अख्तर व्हिडीओमध्ये सांगत आहे की, कलार कहारची एक कहानी आहे. येथे महाराजा शिव राहिले होते व त्यांची लडाई रामचंद्र यांच्याबरोबर झाली होती. ज्यामध्ये त्यांचा विजय झाला. ही जागा हिंदूंसाठी खास आहे. भगवान शिवची जी पत्नी होती, तिचा मृत्यू झाला. त्यानंतर भगवान शंकर उदास झाले आणि ते ऐवढे रडले की, त्यांच्या रडण्याने येथे झरा तयार झाला. या झऱ्याला अश्रूंचा झरा म्हणून देखील ओळखले जाते. आपले हिंदू मित्र येथे येतात व स्नान करतात आणि पाप दूर करतात.

याचबरोबर शोएब अख्तर म्हणाला की, मी पाकिस्तानबद्दल तुम्हाला सांगत आहे. हा देश किती सुंदर आहे. तुम्ही येथे एकदा नक्की या, ही जागा सुरक्षित आहे. तुम्हाला येथे येऊन नक्कीच आनंद होईल.

Leave a Comment