६० लाख आक्षेपार्ह व्हिडिओ ‘टिक-टॉक’ने केले डिलीट


मुंबई : ‘टिक-टॉक’ या मोबाईल अॅपवर भारताच्या ‘कंटेन्ट गाईडलाईन्स’चं उल्लंघन करण्यावरून बरीच टीका झाली. त्यानंतर, जुलै २०१८ नंतरचे तब्बल ६० लाख व्हिडिओज् अल्पावधीतच तुफान लोकप्रियता मिळवलेल्या ‘टिकटॉक’ या अॅपवरचे डिलीट करण्यात आले. याबाबतची माहि्ती ‘टिक-टॉक’ इंडियाच्या सेल्स एन्ड पार्टनरशीप विभागाचे संचालक सचिन शर्मा यांनी दिली आहे.

शर्मा यांनी काही व्हिडिओमुळे भावना दुखावल्या जाऊ शकतात. तर काही व्हिडिओंमुळे लहान मुलांच्या मनावरही विपरित परिणाम होण्याची शक्यता असल्याने, हा निर्णय घेतल्याचे म्हटले आहे. ‘टिक-टॉक’ व्हिडिओ लहान मुलांवरही सर्रास बनवले जातात. युझर्सच्या कलागुणांना चांगला वाव मिळावा आणि त्याबाबतचे चांगलेच व्हिडिओ ‘टिक-टॉक’वर यावे यासाठी प्रयत्नशील असल्याचे, यावेळी शर्मा यांनी स्पष्ट केले आहे.

भारतात ‘टिक-टॉक’चे २० कोटी वापरकर्ते आहेत. ‘टिक-टॉक’ देशातील महत्त्वाच्या १० भाषांमध्ये अॅप उपलब्ध आहे. जुलै २०१८ पासूनचे वादग्रस्त व्हिडिओ हटवण्यात आले आहेत. वादग्रस्त व्हिडिओ यापुढे वापरकर्त्यांपर्यंत पोहचण्याआधीच हटवले जातील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. फक्त सकारात्मक व्हिडिओच यापुढे रिलीज होतील याची काळजी घेऊ, असेही शर्मांनी सांगितले आहे.

Leave a Comment