भारतीय मुळाच्या स्टँँड अप कॉमेडियनचा दुबईमध्ये शो दरम्यान मृत्यू


आपण सादर करीत असलेल्या कार्यक्रमाचे मानसिक दडपण आल्याने मूळचा भारतीय परिवारातील, पण अबुधाबी येथे स्थायिक असलेल्या मंजुनाथ नायडू या स्टँड अप कॉमेडीयनचा स्टेजवरच हृदयविकाराच्या झटक्याने अकस्मात मृत्यू झाला. दुबईमध्ये शो करण्यासाठी आलेला असता, समोर प्रेक्षकांनी खचाखच भरलेल्या सभागृहामध्ये कार्यक्रम सादर करीत असताना, त्याचे मानसिक दडपण येऊन मंजुनाथला हृदयविकाराचा झटका आला असल्याचे प्राथमिक निदान करण्यात आले आहे. खलीज टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार ही घटना शुक्रवारी सायंकाळी घडली.

मंजुनाथ हा आधी अबुधाबीला राहत असून, त्याने काही काळापूर्वी दुबई येथे स्थलांतर केले होते, स्टँड अप कॉमेडियन म्हणून मंजुनाथ अनेक कार्यक्रमांमध्ये सादारीकरण करीत असे. दुबईमध्ये अश्याच एका कार्यक्रमामध्ये सहभागी झालेला असताना अचानक हृदयविकाराचा झटका येऊन मंजुनाथ त्याच्या खुर्चीवून जमिनीवर कोसळला. सुरुवातीला तिथे उपस्थित असलेल्या आयोजकांना आणि प्रेक्षकांना त्याचे खुर्चीवरून जमिनीवर पडणे, हा त्याच्या सादरीकारणाचा भाग असल्याचे वाटले. मात्र मंजुनाथने काही क्षण उलटून गेल्यानंतर कसलीच हालचाल न केल्याने आयोजकांमध्ये एकाच पळापळ उडाली.

त्यानंतर आयोजकांनी रुग्णवाहिकेला पाचारण केले. रुग्णवाहिकेमधून आलेल्या पॅरामेडिक्सना मंजुनाथला हृदयविकाराचा झटका आल्याचे लक्षात आले, मात्र उपचार मिळण्याआधीच मंजुनाथचा मृत्यू झाला असल्याचे घोषित करण्यात आले. मंजुनाथला त्याच्या सादरीकरणाचे तीव्र दडपण आल्याचे त्याच्या बरोबर कार्यक्रमामध्ये सादरीकरण करण्यासाठी आलेल्या इतर स्टँड अप कॉमेडियन्सचे म्हणणे होते. यावरून मंजुनाथला मानसिक दडपणाखाली असल्याने हृदयविकाराचा झटका आला असावा असे प्राथमिक निदान करण्यात आले असून, अद्याप शवविच्छेदानाचा रिपोर्ट आल्याचे वृत्त नाही.

Leave a Comment