प्राणप्रिय कुत्री शोधणाऱ्यास सर्व संपत्ती बक्षीस देण्याची तयारी


अमेरिकेतील टस्कन येथे सध्या एक ‘हरविले आहे’ टाईप पोस्टर खूपच चर्चेत आले आहे. एडी कॉलिन्स यांची चीहूआहूआ जातीची जेनी नावाची कुत्री हरविली असून तिला शोधून देणाऱ्यास अथवा तिची माहिती देणाऱ्यास एडी त्याचे घर, प्लॉट आणि वर्कशॉप इनाम म्हणून देणार आहे. एडीचा जेनीवर फार जीव आहे. तो म्हणतो, ती माझ्या कुटुंबाचा महत्वाचा घटक आहे आणि तिच्याशिवाय राहणे मला अशक्य आहे. ती कुठे, कशी असेल या चिंतेने एडी हैराण झाला आहे.

एडीने तीन आठवड्यापूर्वी जेनीचा फोटो पोस्टर सह प्रसिद्ध केला आहे. त्यावर ‘ मला पहिलेय? माझे वडील मला शोधत आहेत. मी कुठे आहे हे तुम्हाला माहिती असेल तर प्लीज माझ्या वडिलांना कळवा. मला घरी परत जाण्यास मदत करा. माझे वडील तुम्हाला घर, प्लॉट देतील असा मजकूर असून सोशल मिडीयावर तो व्हायरल झाला आहे. एडीने जेनीच्या शोधासाठी खूप प्रयत्न केले आहेत. आता त्याने माय नेम इज जेनी नावाने सोशल मिडियावर कॅम्पेन सुरु केले असून एक न एक दिवस जेनी परत मिळणार अशी त्याची खात्री आहे.

Leave a Comment