नागराज मंजुळेंना ‘कोण होणार करोडपती’साठी मिळाले एवढे मानधन!


‘कोण होणार करोडपती’ या लोकप्रिय रिअॅलिटी शोचे सध्या मराठी ब्लॉकबस्टर चित्रपट ‘सैराट’चे दिग्दर्शक नागराज मंजुळे सूत्रसंचालन करत आहेत. प्रेक्षकांनाही नागराज मंजुळेंचा हा नवा अंदाज चांगलाच भावला आहे. त्याचबरोबर त्यांना या कार्यक्रमासाठी चांगले मानधनही मिळत आहे.

यासंदर्भातील वृत्त ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिले असून त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार या सिझनसाठी नागराज यांना दोन कोटी रुपये मिळत आहेत. एकूण ४५ एपिसोड या सिझनमध्ये असणार आहेत. पण ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या या वृत्ताला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. ‘कोण होणार करोडपती’च्या याआधीच्या पर्वांचे सूत्रसंचालन स्वप्नील जोशी आणि सचिन खेडेकर यांनी केले होते. पण वाहिनीने यंदा एका नव्या चेहऱ्याला संधी देण्यासाठी नागराज मंजुळेंची निवड केली आहे.

हिंदीच्या तुलनेत मराठी कार्यक्रमांचं बजेट कमी असल्याने ‘कोण होणार करोडपती’च्या विजेत्याला मिळणारी रक्कमसुद्धा कमी आहे. अमिताभ बच्चन सूत्रसंचालन करत असलेल्या ‘कोण बनेगा करोडपती’च्या विजेत्याला ७ कोटींची रक्कम मिळते तर मराठीत ही रक्कम १ कोटी रुपये एवढीच आहे.

Leave a Comment