जगातील सर्वात थंड शहर, या ठिकाणी रक्त देखील गोठते


थंडी प्रत्येकाला आवडत असते. मात्र जेव्हा थंडी रक्त गोठवून टाकते आणि जगण्यासाठी संघर्ष करावा लागतो तेव्हा ऋतू होतो. जगामध्ये असे एक शहर आहे, जेथील तापमान 72 डिग्री सेल्सियस पर्यत पोहचले आहे. थंडीमध्ये येथे नेहमी 50 डिग्री सेल्सियस तापमान असते. मात्र तरीही शाळा सुरू असतात. या शहराचे नाव ओय़मयाकोन (Oymyakon) आहे. या शहरामध्ये गरम पाणी देखील हवेत फेकले तर लगेच त्याचा बर्फ होतो. तुम्ही अनेक विचित्र शहरांबद्दल ऐकले असेल, तुम्हाला वाटत असेल असे थोडीच होते. मात्र आज आम्ही तुम्हाला अशाच एका विचित्र शहराबद्दल सांगणार आहोत.

हे जगातील सर्वात थंड शहर आहे. या पेक्षाही थंड ठिकाणं आहेत मात्र ती शहरं नाहीत. येथे एवढी थंडी आहे की, जर तुम्ही गाडीचे इंजिन बंद केले तर गाडी पुन्हा सुरू देखील होत नाही. अनेक पर्यटकांसाठी हे उत्तम डेस्टिनेशन आहे. मात्र येथे सर्वजण येऊ शकत नाही. या शहरात येण्याआधी ट्रेनिंग दिली जाते.

हिवाळ्यात येथे पाण्याची मोठी समस्या असते. कारण पाईपमध्ये असलेले पाणी गोठून गेलेले असते. अशावेळेस पाणी पिण्यासाठी बर्फ वितळवून पाणी पिले जाते. थंडीमध्ये पाणी गोठल्यावर लोकं घरातील बाथरूमचा देखील वापर करत नाहीत. अशावेळेस थंडीत लोकांना बाहेर जावे लागते.

थंडीमध्ये येथे पोहचण्यासाठी दोन दिवस गाडीचा प्रवास करावा लागतो. कारण येथे एवढा बर्फ असतो की, कोणतेही विमान उतरू शकत नाही. जवळील शहर याकुत्सपासून दोन दिवसांचा कारचा प्रवास करावा लागतो. शहरातील अनेक चौकांमध्ये थर्मामीटर लावण्यात आलेले आहेत, शहरातील मुख्य चौकात एक निशाण आहे, जे दर्शवते की सर्वात कमी तापमान कधी होते. हे शहर आर्कटिक सर्कलपासून जवळ असल्याने, हिवाळ्यात येथे 21 तास अंधार असतो.

जर तुम्ही शाकाहारी असाल, तर तुम्हाला या शहरात खाण्यासाठी अडचणींना सामोरे जावे लागू शकते. कारण हिवाळ्यात येथे शेती होत नाही आणि उन्हाळ्यात खूप कमी शेती केली जाते. येथील लोक ससा, मासे, अंडी यांच्यावर जिंवत राहतात. हे जेवण त्यांच्या शरीराला गरम ठेवते. मेलेले प्राणी देखील गोठून जातात, त्यांना शिजवण्यासाठी त्यांना आधी वितळावे लागते.

जर तुम्ही या ठिकाणी फिरायला जाणार असाल, तर विशेष काळजी घेतली पाहिजे. कारणे येथील लोकांना येथील वातावरणाची सवय झाली आहे. मात्र फिरायला येणाऱ्यांना अनेक अडचणी येऊ शकतात. त्यांच्या ह्रदयाचे ठोके वाढतात. बोटे देखील कापावे लागतात. त्यामुळे येथे जाण्याआधी ट्रेनिंग दिले जाते. त्यामुळे येथे जाण्याचा विचार करत असाल, तर पुर्ण तयारी करूनच जा.

Leave a Comment