हाफिज सैद कैदेत नाही तर पोलीस अधिकाऱ्याच्या बंगल्यात


मुंबई हल्ल्याच्या मास्टरमाइंड आणि जमात उल दावाचा प्रमुख हाफिज सैद याला अटक केल्याचे पाकिस्तानचे नाटक दुसऱ्याच दिवशी उघडकीस आले असून हाफिज याला तुरुंगात नाही तर तुरुंगाजवळ असलेल्या जेल अधीक्षकाच्या बंगल्यात ठेवल्याचे स्पष्ट झाले आहे. हाफिज याला तेथे व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जात असल्याचे मिडिया रिपोर्ट मध्ये म्हटले गेले आहे.

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान २१ जुलै रोजी अमेरिका भेटीवर जाणार असून २२ जुलै रोजी डोनाल्ड ट्रम्प यांना भेटणार आहेत. हाफिज सैद याला संयुक्त राष्ट्राने जागतिक दहशदवादी घोषित केलेच आहे पण अमेरिकेने सुद्धा हाफिजवर १ कोटी डॉलर्स म्हणजे ७० कोटी रुपयांचे इनाम जाहीर केले आहे. हाफिज याला अटक केली जावी असा पाकिस्तानवर दबाब आहे आणि भारताने हाफिजला अटक केली जावी यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर दीर्घकाल दबाव आणला आहे.

अमेरीका दौऱ्यावर जाण्यापूर्वी इम्रान खान यांनी हाफिज सैद याला बुधवारी अटक केल्याचे आणि त्याला ७ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली गेल्याचे जाहीर केले होते. हाफिजवर दहशतवादी कारवाया करण्यासाठी फंड पुरविल्याचा आरोप ठेवला गेला असून त्याला गुजरांवाला जेल मध्ये ठेवल्याचे सांगितले जात होते. मात्र तो जेल मध्ये नसून पोलीस अधिकाऱ्याच्या बंगल्यात असल्याचे मिडिया रिपोर्ट मध्ये म्हटले गेले आहे.

Leave a Comment