पार्टीमध्ये झेब्रा कमी पडले म्हणून, गाढवांनाच दिला झेब्र्यासारखा रंग


स्पेन : स्पॅनिश बीच टाऊनमध्ये सफारी थीम लग्नाच्या रिसेप्शनमध्ये दोन गाढवांना झेब्र्यासारखा रंग देण्यात आल्याची घटना घडली आहे. दोन गाढवांना झेब्र्याप्रमाणे काळा आणि पाढंरा रंग देण्यात आला जेणेकरून ते झेब्र्यासारखे दिसतील. सोशल मीडियावर याचे फोटो व्हायरल झाले आहेत.

या रिसेप्शनमध्ये सहभागी झालेल्या एका व्यक्तीने पार्कमध्ये दोन गाढवांना गवत खाताना आणि चालताना पाहिले. त्याला हे झेब्रानसून गाढव आहे याची माहिती पडताच त्याने प्राण्यांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या संस्थेला याबाबत माहिती दिली.

LA ÚLTIMA BURRADA: No se dejen engañar por las imágenes. No se trata del tanzano Serengeti, con sus infinitas planicies…

Posted by Angel Tomás Herrera Peláez on Sunday, July 14, 2019

या व्यक्तीने फेसबूकवर फोटो शेअर करत लिहिले की, गाढवांचे अस्तित्व धोक्यात आहे. याप्रकारे यांचे शोषण केले जात आहे.

हे फोटो बघितल्यानंतर अनेक लोकांनी ही घटना लाजीरवाणी असल्याचे म्हटले आहे. सोशल मीडियावर टाकण्यात आलेले फोटो आणि व्हिडीओ बघून लोकांनी कमेंट्स केल्या की, गाढवांना झेब्र्याप्रमाणे दाखवण्याचे काम नक्कीच अपमानकारक आहे. तसेच याबाबत तक्रार दाखल करण्यात आली असून, चौकशी सुरू आहे.

अशी घटना पहिल्यांदा घडलेली नाही. याआधी देखील इजिप्तच्या प्राणी संग्रहालयात देखील गाढवांना झेब्र्यासारखा रंग देण्यात आला होता.

Leave a Comment