मिराज-2000 क्रॅशमध्ये शहीद झालेल्या वैमानिकाची पत्नी वायुसेनेत होणार सामिल


5 महिन्यांपुर्वी झालेल्या मिराज-2000 च्या क्रॅशमध्ये स्क्वाड्रन लीडर समीर अब्रोल यांचा मृत्यू झाला होता. आता त्यांच्या पत्नी गरिमा अब्रोल या सर्विस सिलेक्शन बोर्ड ही परिक्षा पास झाल्या आहेत. त्यामुळे त्या आता लवकरच वायुसेनेत भर्ती होणार आहेत. निवृत्त एअर मार्शल अनिल चोप्रा यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली. चोप्रा यांनी सांगितले की, गरिया या प्रथम तेलंगानाच्या दुंदिगल एअरफोर्स अकडमीमध्ये सहभागी होतील. त्यांनतर जानेवारी 2020 मध्ये त्या वायुसेनेत सामिल होतील.

चोप्रा यांनी गरिमा आणि समीर यांचा फोटो पोस्ट करत त्यांना एक असाधारण महिला असल्याचे म्हटले आहे.

विमानातून बाहेर पडल्यानंतर मृत्यू  –

बँग्लोरमध्ये 1 फेब्रुवारीला एक ट्रेनी लष्करी विमान मिराज-2000 चा अपघात झाला होता. यामध्ये दोन पायलट्सचा मृत्यू झाला होता. ही घटना हिंदूस्तान एयरनॉटिक्स लिमिटेडच्या एअरपोर्टवर घडली होती. विमानामध्ये समीर अब्रोल यांच्याबरोबर त्यावेळी सिद्धार्थ नेगी हे देखील होते. घटनेच्या वेळी दोघेही जण विमानातून बाहेर पडले होते.  मात्र विमानाचा भाग अंगावर पडल्याने एका पायलटचा मृत्यू झाला होता तर एका पायलटचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता.

सरकार करत आहे घटनेची चौकशी –

या प्रकरणामध्ये समीरचे भाऊ सुंशात यांनी चौकशीची मागणी केली होती. दोन्ही पायलट्सनी विमानामध्ये काहीतरी बदल केल्यानंतरच टेस्ट फ्लाइटसाठी उड्डाण घेतले होते. रिपोर्टनुसार, टेक ऑफनंतर विमानाचे लॅडिंग फेल झाली होती. या दरम्यान विमानाचा पुढील भाग रनवेच्या गेटला अडकून तुटला. गरिमा यांनी या प्रकरणात सरकारला न्याय देण्याची मागणी केली होती.