जेफ बेझॉस आणि गर्लफ्रेंड लॉरेन साचेंज विम्बलडनच्या फायनल दरम्यान दिसले एकत्र


अमेझॉनचे फाउंडर आणि सीईओ जेफ बेझॉस रविवारी गर्लफ्रेंड लॉरेन साचेंज हिच्याबरोबर विम्बलडन टेनिस स्पर्धेच्या पुरूष एकेरीच्या अंतिम सामन्याचा आनंद घेताना दिसून आले. जानेवरीमध्ये दोघांच्याही नात्याबद्दल चर्चा सुरू झाल्यानंतर पहिल्यांदाच दोघेजण सार्वजनिक ठिकाणी एकत्र दिसले आहेत. याशिवाय ते प्रिंस विलियम आणि केट मिड्लटॉन यांच्या मागच्या रांगेतच बसले होते.

एप्रिलमध्ये बेझॉस यांनी 25 वर्ष जुने लग्न मोडत बायको मँकेंजीबरोबर घटस्फोट घेतला होता. त्या दोघांनाही चार मुले आहेत.

घटस्फोटनंतर त्यांची पत्नी मँकेजी या कंपनीतील 38.3 मिलियन डॉलरचे स्टेक स्वतःकडेच ठेवणार आहे. याशिवाय यातील अर्धी रक्कम दान करण्याच देखील मँकेजी विचार करत आहे. एवढ्या संपत्तीनुसार त्या जगातील 22 व्या सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत.

याशिवाय बेझॉस यांची गर्लफ्रेंड सांचेझ हिने देखील पती पॅट्रिक व्हाईटसेल याच्याबरोबर घटस्फोट घेतला आहे. त्या दोघांनाही दोन मुले आहेत.

Leave a Comment