
सुप्रसिद्ध गणितज्ज्ञ आनंद कुमार यांच्या जीवनावर आधारित हृतिक रोशनचा ‘सुपर ३०’ चित्रपट आहे. या चित्रपटातून आनंद कुमार यांचा प्रेरणादायी प्रवास उलगडण्यात आला आहे. बिहार येथील ते मुळचे असल्यामुळे टॅक्स फ्री त्यांचा प्रवास प्रेक्षकांना दाखवण्याचा निर्णय बिहार सरकाराने जाहिर केला आहे. आजपासून हा चित्रपट सिनेमागृहात टॅक्स फ्री झाला आहे.
बिहारमध्ये टॅक्स फ्री होणार ‘सुपर ३०’
#Super30 is tax-free in #Bihar.
— taran adarsh (@taran_adarsh) July 15, 2019
प्रेक्षकांचा हृतिकच्या ‘सुपर – ३०’ चित्रपटाला भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाने पहिल्याच आठवड्यात ५० कोटींचा गल्ला जमवला आहे. या चित्रपटाच्या कमाईत आणखी भर पडण्याची शक्यता चित्रपट समीक्षकांनी व्यक्त केली आहे.
