आयसीसीच्या नियमांवर बिग बी यांची टीका


लंडन – विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यातील सुपर ओव्हरमध्येही सामना अनिर्णित राहिल्याने इंग्लंडला सर्वाधिक चौकारांच्या निकषावर विश्वविजेता घोषित करण्यात आले. आयसीसीच्या सुपर ओव्हरच्या ‘जाचक’ नियमावर यानंतर जगभरातून राग व्यक्त करण्यात आला. हा नियम बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनाही मान्य नाही. त्यांनी आयसीसीला ट्विटरच्या माध्यमातून इंग्लंडच्या विजयानंतर धारेवर धरले आहे. आपल्या ट्विटरवर बिग बी यांनी आयसीसीच्या नियमांवर टीका करत पोस्ट शेअर केली आहे. ते म्हणाले, तुमच्याकडे 2000 रुपये आहेत, माझ्याकडे 2000 रुपये आहेत. तुमच्याकडे 2000 ची नोट आहे, माझ्याकडे 500 च्या 4 नोटा आहेत, तर सर्वात श्रीमंत कोण? आयसीसी म्हणते – ज्याच्याकडे 500 च्या 4 नोटा तो श्रीमंत आहे.


बच्चन दुसऱ्या ट्विटमध्ये म्हणाले, म्हणूनच आई म्हणायची की ‘चौका’ बरतन यायला पाहिजे.

Leave a Comment