क्रिकेटच्या मैदानात पॉर्नसाईटच्या मालकाच्या आईचा धुमाकुळ


आयसीसी विश्वचषक स्पर्धेतील अंतिम फेरीच्या सामन्यात यजमान इंग्लंडने न्यूझीलंडचा पराभव करत विश्वचषक आपल्या नावे केला. इंग्लंडने अक्षरशः अटीतटीच्या या सामन्यात मोक्याच्या क्षणी विजय मिळवत जगज्जेते पदावर आपले नाव कोरले. अगदी शेवटच्या क्षणापर्यंतही या सामन्यात नेमके कोणाचे पारडे जड आहे याचा अंदाज लावणे कठीण होते, दोन्ही संघाच्या चाहत्यांमध्ये यामुळे चिंता, उत्सुकता असा संमिश्र भाव पाहायला मिळत होता, पण तेवढ्यात मैदानात असे काही घडले की ज्यामुळे सगळे क्रिकेटप्रेमी चिंता विसरून डोळे विस्फारून बघत राहिले. एलिना वुलित्‍सकी नामक एका 47 वर्षीय महिलेने सामना सुरु असतानाच मैदानात धाव घेतली. तिने यावेळी काळ्या रंगाचे कपडे घातले होते विटाली अनसेंसर्ड असे ज्यावर लिहिले होते. XXX या पॉर्न साईटचा मालक विटाली डोरोवेत्‍सकी याची ही महिला आई आहे.


तिने मैदानात XXX या पॉर्न साईटची जाहिरात करण्यासाठीच धाव घेतली होती. सुरक्षा रक्षकांनी यानंतरतिला पकडून मैदानाच्या बाहेर काढण्याचा प्रयत्न केला पण ती तरीही ऐकत नसल्याने त्यांना अखेरीस या महिलेला उचलून बाहेर काढावे लागले, सध्या सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडीओ आणि फोटो जोरदार व्हायरल होत आहे.


एलिना यांचे फोटो व्हायरल होताच यावर विटाली डोरोवेत्‍सकी, याने सुद्धा ट्विटरवरून आपली आई वेडी आहे असे म्हणत प्रतिक्रिया दिली आहे. तर त्याच्या सोबतच अन्य नेटकऱ्यांनी सुद्धा एलिनाचे फोटो शेअर करत तिला बिनधास्त म्हटले आहे.


यापूर्वी विटाली अनसेंसर्ड या साईटची जाहिरात करण्यासाठी विटाली डोरोवेत्‍सकी याची गर्लफ्रेंड सुद्धा युरोपियन चॅम्पियन्स लीग दरम्यान अशाच प्रकारे मैदानात उतरली होती, त्यावेळेसही असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. कालच्या सामन्यात न्यूझीलँडचा संघ फलंदाजी करत असताना हा संपूर्ण प्रकार घडला.

Leave a Comment