सध्या सोशल मीडियावर ‘बॉटल कॅप चॅलेंज’ जोरदार व्हायरल होत आहे. हे बॉटल कॅप चॅलेंज टीव्ही कलाकरांपासून बॉलिवूड कलाकरांपर्यंत सर्वांनीच पूर्ण केले आहे. हे आव्हान कोणी अगदी मजेशीर स्टाईलने, तर कोणी आपल्या हटके अंदाजात स्विकारून सोशल मीडियावर आपले व्हिडिओ शेअर केले आहेत. हे चॅलेंज बॉलिवूडचा भाईजान सलमान खान यानेही स्वीकारून पूर्ण केले आहे. पण त्याने यासोबतच एक मोलाचा सल्लादेखील आपल्या चाहत्यांना दिला आहे.
भाईजानने मजेशीर अंदाजात पूर्ण केले ‘बॉटल कॅप चॅलेंज’
Don’t thakao paani bachao pic.twitter.com/PjfdGxdTJg
— Salman Khan (@BeingSalmanKhan) July 14, 2019
आपल्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडिओ सलमान खानने शेअर केला आहे. सलमान या व्हिडिओमध्ये अगदी मजेशीर पद्घतीने हे चॅलेंज पूर्ण करतो. त्यासोबत पाणी वाचवा, असा संदेश चाहत्यांना देतो. सलमानपूर्वी हे चॅलेंज अक्षय कुमार, टायगर श्रॉफ, विद्युत जामवाल, कुणाल खेमू यांसारख्या कलाकारांनी पूर्ण केले आहे. त्यांच्याव्यतिरिक्त सिद्धार्थ मल्होत्रा, सुष्मिता सेन, यांचेही व्हिडिओ समोर आले होते.