यजमान साहेबांच्या विजयावर क्रिकेट चाहत्यांचे प्रश्नचिन्ह


लॉर्डस – आयसीसी विश्वचषक स्पर्धेतील अतिशय थरारक आणि शेवटच्या क्षणापर्यंत श्वास रोखून धरायला लावणाऱ्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा इंग्लडने पराभव केला आणि विश्वचषकावर क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच नाव कोरले. उत्कंठावर्धक सामना टाय झाल्याने हा सामना सुपर ओव्हर खेळवण्यात आली. पण ती सुपर ओव्हर देखील बरोबर सुटली पण या सुपर ओव्हरमध्ये झालेल्या बरोबरीमुळे यजमान इंग्लड संघाला विजेता घोषित करण्यात आल्यामुळे अनेक क्रिकेट चाहत्यांना हे असे कसे काय घडले असा प्रश्न पडला आहे.


सामना जर सुपर ओव्हरमध्येही टाय झाला तर दोन्ही संघांपैकी कोणी जास्त चौकार लगावले आहेत, त्यावर आयसीसी निर्णय देते. इंग्लंडने सुपर ओव्हरमध्ये प्रथम फलंदाजी करताना दोन चौकार लगावले, तर एकही चौकार न्यूझीलंडला लगावता आला नाही. न्यूझीलंडपेक्षा इंग्लडने संपूर्ण सामन्यात जास्त चौकार लगावल्यामुळे इंग्लंडला जास्त चौकार लगावल्यामुळे विश्वविजेता घोषित करण्यात आले.

Leave a Comment