सोशल मीडियात व्हायरल होत आहेत आजीबाई बुमराह


मुंबई : गेल्या दोन-तीन वर्षांमध्ये क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये भारतीय क्रिकेट संघाचा यॉर्करमॅन जसप्रीत बुमराह हा एक उत्कृष्ट गोलंदाज म्हणून समोर आला. जसप्रीत बुमराहमध्ये खेळाच्या कुठल्याही परिस्थितीत विकेट घेण्याची क्षमता आहे. त्याने जगातील टॉप रँकिंग गोलंदाजांच्या पंगतीत आपले स्थान निर्माण केले आहे.

बुमराहचा आज देशातील प्रत्येक क्रिकेटप्रेमी फॅन आहे. मग तो लहान मुलगा असो किंवा उतरत्या वयातील कुणी वृद्ध. सध्या अशाच एका आजीचा व्हिडीओ ट्विटरवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो आहे. या आजी यामध्ये बुमराहच्या गोलंदाजीची नक्कल करताना दिसत आहे. शनिवारी हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर करण्यात आला.


आमची आईदेखील इतरांप्रमाणे विश्वचषकातील बुमराहच्या प्रदर्शनाने एवढी प्रभावित झाली आहे की, त्यांनी बुमराहच्या रन-अपची नक्कल करण्याचा निर्णय घेतला, असे या ट्विटर युझरने लिहिले.


शांता सक्कुबाई नावाच्या ट्विटर युझरने हा व्हिडीओ शेअर केला. एक वृद्ध महिला व्हिडीओमध्ये जसप्रित बुमराहच्या गोलंदाजीची नकक्ल करताना दिसत आहेत. त्याचबरोबर या व्हिडीओला बुमराहनेही त्याच्या ट्विटर हॅण्डलवर शेअर केला. याने माझा दिवस आणखी खास बनवला, असे ट्विट करताना बुमराहने लिहिले.

Leave a Comment